नवी दिल्ली, 2 मार्च: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित खूप साऱ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. एफसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 89 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवार एफसीआय पोर्टल fci.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची तारीख - 01 मार्च 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 मार्च 2021 अर्ज फी - 1000 रुपये पद : सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) - 30 पदे सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 27 पदे. सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 22 पदे सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 08 पदे वैद्यकीय अधिकारी – 02 पदे वेतनमान : सहाय्यक महाप्रबंधक - 60000-180000 / - महिना वैद्यकीय अधिकारी - 50,000-1,60,000 / - महिना वयो-मर्यादा : सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) - 30 वर्षांपर्यंत सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 28 वर्षांपर्यंत सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 28 वर्षांपर्यंत सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 33 वर्षांपर्यंत वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षांपर्यंत शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) - कोणत्याही विषयात पदव्युत्तर. सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – कृषी क्षेत्रातील बीएससी किंवा अन्न विज्ञानात बी.टेक किमान 50% गुणांसह.सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटचे सदस्य. सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – कायद्याची पदवी आणि दिवाणी न्यायालयात किमान पाच वर्षे वकिलीचा अनुभव. वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
अवश्य वाचा - अखेर ठरलं! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं फायनल वेळापत्रक जाहीर
निवड प्रक्रिया: सहाय्यक व्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन परीक्षा 2:30 तासांची असेल. यामध्ये जनरल एप्टीट्यूड, जनरल अवेयरनेस, अॅग्रीकल्चर इकॉनॉमी, कॉम्प्युटर आणि जॉबसंबंधीचे मूलभूत ज्ञान यासंबंधी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 180 मार्कांची असणार असून यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसणार आहे.