भोपाळ, 16 जून: यूपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC) परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेक तरुण, तरुणी उराशी बाळगतात. हे स्वप्न साकार करण्यासाठी ते जीवापाड मेहनत करतात. यात काही जण यशस्वी होतात तर काही जणांना अपशयाचा सामना करावा लागतो. मात्र असेही काही विद्यार्थी असतात जे वारंवार अपयश येऊनही प्रयत्न सोडत नाहीत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्रेया रॉय (Sherya Rai) ही अशा विद्यार्थ्यांपैकी एक. पण तिची कहाणी जरा वेगळी आहे. श्रेया मूक-बधीर आहे. असे असतानाही तिनं जिद्द न सोडता घेतलेले कष्ट तिला यश देऊन गेले. यूपीएससी आयईएस (UPSC IES) परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात ती टॉपर (Topper) ठरली आहे. यूपीएससीतर्फे भारतात सर्वांत कठीण परीक्षेचे आयोजन केले जाते. अनेक विद्यार्थ्यांना बऱ्याचवेळा प्रयत्न करुनही ही परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. मात्र मध्य प्रदेशातील श्रेया रॉय याला अपवाद आहे. ती दुसऱ्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. पहिल्या प्रयत्नात या परीक्षेत जी रॅंक (Rank) मिळाली, त्याबाबत 25 वर्षीय श्रेया काहीशी नाखूष होती. त्यानंतर तिने यूपीएससी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची (IES) पुन्हा परीक्षा दिली आणि ती अखिल भारतीय स्तरावर 60 वी रॅंक मिळवली तसेच ती मूक-बधिर (Hearing and Speech Impaired) गटात टॉप ठरली. हे ही वाचा: 30 वर्षाच्या नोकरीनंतर MAला प्रवेश; पुण्यातील 56 वर्षीय महिलेनं पटकावली 4 पदकं पण हा तिचा काही पहिला पराक्रम नव्हता. श्रेयाने या पूर्वी कोएल इंडिया, न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन आणि पॉवर ग्रीड ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती परीक्षा दिलेल्या आहेत. अनेक सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या मिळूनही श्रेयाला कलेक्टर (District Collector) होण्याची इच्छा असल्याने तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मूक-बधीर असूनही श्रेया ही उत्तम विद्यार्थी आहे. ती केवळ जास्त तीव्रतेचे म्हणजेच फटाके किंवा वाहनांचे मोठे हॉर्नचे आवाज ऐकू शकते. ती जेव्हा दिड वर्षांची होती, तेव्हाच तिच्या पालकांना तिची शारीरिक मर्यादा लक्षात आली होती. परंतु, आपल्या मुलीनं सामान्य मुलांसारखं आयुष्य जगावं तिला या असहायतेची जाणीव होऊ नये, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे श्रेयाने विशेष शाळेत प्रवेश न घेता मध्य प्रदेशातील मुख्य प्रवाहातील चिन्मय मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. हे ही वाचा: जिद्दीला सलाम! हार न मानता दिली 5 वेळा UPSCची परीक्षा इंदौरमध्ये बी.ई.साठी तिला सीट उपलब्ध होणे हे एक आव्हान होते, असे तिचे पालक सांगतात. तिच्या मित्रांनी प्रत्येक टप्प्यावर तिला नोटस उपलब्ध करुन देत मदत केली. तिचे आयएएस अधिकारी काका शाश्वत रॉय, आणि आयएएस अधिकारी सुरभी गौतम यांनी श्रेयाला आयएएसच्या अभ्यासासाठी मदत केली. श्रेया ही मूळची मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातली. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. श्रेयाची आई अंन्शु रॉय या एका खासगी शाळेत उपमुख्याध्यापक तर वडील संजय हे शेअर बाजारात कार्यरत आहेत. श्रेयाला शिवांश नावाचा धाकटा भाऊ असून, तो सध्या इयत्ता 8 वीमध्ये आहे. त्याला शास्त्रज्ञ व्हायचंय. श्रेयाला अभ्यासाव्यतिरिक्त चित्रकला आणि क्लासिकल डान्सची आवड आहे. यूपीएससी परीक्षेसाठी श्रेया दिवसातील 16 तास अभ्यास करत असे. श्रेयाची यूपीएससीची मुलाखत फेरी अव्दितीय होती. कारण मुलाखत घेणाऱ्या मंडळाने स्क्रिनवर प्रदर्शित करुन प्रश्न विचारले. श्रेयाने या प्रश्नांची उत्तरे टाईप करुन दिली.