काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही कधीही करू नये
मुंबई, 03 फेब्रुवारी: कोरोनामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील (Corporate world) बहुसंख्य कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत अनेकजण काम करत आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांना घरचे सर्व काम करून ऑफिसचे काम करावे लागत आहेत. ऑफिसचं काम सांभाळत असताना कर्मचाऱ्यांवर ताण (stress while doing work from home) येतो आहे. म्हणुनच अनेकजण प्रोडक्टीव्ह (How to be productive during WFH) काम करू शकत नाहीये. ताण आल्यामुळे अनेकजण वर्क फ्रॉम होम करताना अनेक चुका (Mistakes during working from home) करतात. कधी वर्क फ्रॉम होम करताना कंपनीच्या काही कामांकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे तुमचं संपूर्ण करिअर (Career Tips in Marathi) धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही चुकांबद्दल (Mistakes to avoid during WFH) सांगणार आहोत ज्या तुम्ही कधीही करू नये. चला तर मग जाणून घेऊया. ऑफिस सोडून टाईमपास करणे ऑफिसमध्ये कामासाठी जाण्यासाठी कर्मचार्यांनी शिस्तबद्ध असणं आणि त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्यांशी बांधील असणं आवश्यक आहे. तसंच घरून काम करताना फक्त आणि फक्त कामच करणं आवश्यक आहे. अनेक कर्मचारी पगारी सुट्टी म्हणून घरून काम करण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे कोणी नाही असं त्यांना वाटतं. मात्र असं अजिबात नाही. नेटफ्लिक्सवर नवीन मालिका पाहणे किंवा मित्राशी चॅट करणे यासारख्या कामाच्या वेळेत अनुत्पादक गोष्टींवर अधिक वेळ घालवणे ही सवय बनते. यामुळे तुमचं काम पूर्ण होऊ शकत नाही. हि चूक अजिबात करू नका. ऑफिसच्या कामाप्रती प्रामाणिक राहा. Government Jobs: CSIR-NEERI मध्ये तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या लिंक कामाची जागा चांगली नसणे घरून काम करणं प्रत्येकासाठी विशेष म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत अशा लोकांसाठी अजिबात सोपी नाही. म्हणूनच लहान मुलं किंवा टीव्ही यांसारख्या घरातील कोणत्याही मोठ्या विचलनापासून मुक्त असलेली शांत जागा निवडणं अत्यावश्यक आहे. घरून काम करणार्या कर्मचार्यांनी अधिक उत्पादक राहण्यासाठी स्वच्छ डेस्क वापरला पाहिजे. तुमच्या कार्यक्षेत्राजवळ खाद्यपदार्थ खाणं टाळा आणि मुलांना तुमच्या लॅपटॉपपासून दूर ठेवा. स्वतच्या कामाचा रेकॉर्ड न ठेवणे काही कर्मचारी काम करताना स्स्वतच्या कामाचा रेकॉर्ड ठेवत नाहीत. यामुळे जर त्याब्च्या मॅनेजरने विचारलं तर ते स्वतच्या कामाबद्दल सांगू शकत नाहीत. मात्र हि तुमची घोडचूक असू शकते. म्हणूनच या चुकांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी, तुमच्या कामाचा रेकॉर्ड ठेवा आणि दिवसाच्या शेवटी त्यांचं निरीक्षण करा. ‘टू-डू लिस्ट’ राखून ठेवल्याने तुम्हाला तुमच्या कामाला सहजपणे प्राधान्य देण्यात आणि उत्पादक राहण्यास मदत होते. कॅम्पस प्लेसमेंटसाठी Group Discussion ची तयारी करताय? जाणून घ्या काय करावं आणि काय करू नये सहकाऱ्यांशी न बोलणे वर्क फ्रॉम होममुळे सर्व ऑफिसमधील सहकारी एकमेकांच्या दूर झाले आहेत. त्यांच्यामधील बोलणंही कमी झालं आहे. मात्र ही चूक करू नका. स्वतच्या कामात सक्षम व आणि आपल्या सहकाऱ्यांशी याबद्दल बोलत राहा. यामुळे तुम्हाला मदत होईल आणि कंपनीत तुमचं इम्प्रेशन चांगलं राहील.