JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MHT CET 2020 : इंजीनिअरिंग प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

MHT CET 2020 : इंजीनिअरिंग प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

महाराष्ट्रात इंजीनिअरिंगची कॉमन एंट्रन्स टेस्टच्या MHT CET 2020 तारखांची घोषणा करण्यात आली आहे. mahacet.org या वेबसाईटवरून परीक्षांच्या तारखांची माहिती जारी करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : महाराष्ट्रात इंजीनिअरिंगची कॉमन एंट्रन्स टेस्टच्या MHT CET 2020  तारखांची घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने याची घोषणा केली आहे. 16 मे ते 20 मे 2020 दरम्यान CET होणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागेल. या विषयीची अधिक माहिती mahacet.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे. MHT CET परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्किंग होत नाही. या परीक्षेचा पेपर अकरावी - बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. JEE mains सारखीच या परीक्षेची काठीण्यपातळी असते. गेल्या वर्षीपासून या परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेतल्या जात आहेत. याही वर्षी ही एंट्रन्स एक्झॅम कॉम्प्युटर बेस्ड मोड असेल. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे मुख्य विषय या परीक्षेसाठी असतात. अन्य बातम्या झोप पूर्ण होऊनही सतत थकवा जाणवतो, ही आहेत त्याची 10 कारणं फटाक्यांमुळे भाजल्यावर चुकूनही करू नका या 5 चुका, घरगुती उपायांनी करा उपचार छोट्या मुलीचा हा Video होतोय व्हायरल, बिग बींही झाले दिवाने

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या