JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

Jobs, Police - तुम्हाला पोलीस दलात काम करायचं असेल तर उत्तम संधी आहे

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 सप्टेंबर : तुम्हाला पोलिसात काम करायचंय? मग एक उत्तम संधी आलीय. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत. उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय. Teachers Day 2019 : शिक्षक व्हायचंय? मग या अभ्यासक्रमांची माहिती हवीच उमेदवाराकडे ही कागदपत्रं हवीच तुम्हाला तुमचा फोटो आणि सही ऑनलाइन अपलोड करायची आहे. फोटो 50 KB असायला हवा. आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास ते प्रमाणपत्र हवं. जातीचं आरक्षण असेल तर जात प्रमाणपत्र हवं. MS/CIT प्रमाणपत्र, सरकारनं मान्यता दिलेल्या कम्प्युटर कोर्सचं प्रमाणपत्र हवं. लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे ओळखपत्र हवं. ते पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट चालेल. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला हवा. या सर्व कागदपत्रांची झेराॅक्स हवी. मुंबई मेट्रो रेल्वेत मोठी व्हेकन्सी, ‘या’ उमेदवारांनी करा अर्ज कुठे किती पोलीस भरती? मुंबई पोलीस भरती – 1076 पिंपरी चिंचवड  – 720 रत्नागिरी  – 66 रायगड – 81 कोल्हापूर – 78 सोलापूर – 76 पालघर – 61 पुणे रेल्वे – 77 पुणे ग्रामीण – 21 पुणे – 214 जळगाव - 128 सांगली – 105 सातारा – 58 औरंगाबाद –91 नागपूर – 288 मुंबई रेल्वे – 60 नवी मुंबई – 61 ठाणे –100 धुळे – 16 नंदुरबार -25 भंडारा – 22 सिंधुदुर्ग – 21 जालना -14 SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice इथे क्लिक करा. महापोर्टलद्वारे ही पहिलीच भरती आहे. अर्ज स्वीकारणं 3 सप्टेंबरपासून सुरू झालंय. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2019. दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या