JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra NEET Counselling: राज्यात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी वेबसाईट झाली लाँच; असा मिळणार प्रवेश

Maharashtra NEET Counselling: राज्यात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी वेबसाईट झाली लाँच; असा मिळणार प्रवेश

राज्य-आधारित महाविद्यालयांसाठी NEET 2021 चं वेळापत्रक लवकरच सुरू होईल. जे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत

जाहिरात

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात NEET चा निकाल (NEET Result 2021) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रानं वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी काउन्सिलिंग (Maharashtra NEET Counselling) करण्यासाठी अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे. ज्या उमेदवारांनी NEET उत्तीर्ण केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश (How to get admission in Medical Colleges in Maharashtra) घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना info.mahacet.org वर रजिस्ट्रेशन करायचं आहे, सेंट्रल काउन्सिलिंग नोंदणी लिंक आणि वेळापत्रक अद्याप जारी करण्यात आलेलं नाही. मात्र राज्य-आधारित महाविद्यालयांसाठी NEET 2021 चं वेळापत्रक लवकरच सुरू होईल. जे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत सेट काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत आणि त्यांनी राज्यातील शाळेत शिकलेले असावे. राज्य कोट्यातील उमेदवारांसाठी 1000 रुपये, संस्थात्मक कोट्यासाठी 5000 रुपये आणि राज्य आणि संस्थात्मक कोट्यासाठी 6000 रुपये समुपदेशन शुल्क आहे. भारतीय विद्या भवन मुंबई इथे प्राध्यापक पदाच्या 24 जागांसाठी भरती; करा अर्ज भारतात उपलब्ध असलेल्या एकूण वैद्यकीय जागांपैकी 85 टक्के जागा राज्य-आधारित काउन्सिलिंगद्वारे वाटप केल्या जातात. मेडिकल कौन्सिल कमिटी (MCC) द्वारे केवळ 15 टक्के जागा केंद्रीय पद्धतीने दिल्या जातात. ही कागदपत्रं आवश्यक NEET 2021 चे प्रवेशपत्र NEET 2021 चे निकाल किंवा रँक लेटर दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र सरकारने जारी केलेला फोटो आयडी पासपोर्ट आकाराचे फोटो जात प्रमाणपत्र, लागू असल्यास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या