JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra 12th Result 2021: कधी लागणार बारावीचा निकाल? लवकरच होणार घोषणा

Maharashtra 12th Result 2021: कधी लागणार बारावीचा निकाल? लवकरच होणार घोषणा

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा (Official Announcement) सोमवारी होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं.मात्र आता मंडळाची निकाल जाहीर करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याने हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. हे वाचा - विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक; आताच बघा दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाकडून रोल नंबर जारी बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या