JOIN US
मराठी बातम्या / करिअर / आता गणिताचं नो टेन्शन! बारावीनंतर करिअर करण्यासाठी 'हे' आहेत टॉप कोर्सेस

आता गणिताचं नो टेन्शन! बारावीनंतर करिअर करण्यासाठी 'हे' आहेत टॉप कोर्सेस

आम्ही तुम्हाला काही कोर्सेसबदल माहिती देणार आहोत जे करून तुम्ही गणिताशिवाय करिअर करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : येत्या काही दिवसात बारावी आणि दहावीचा निकाल (10th and 12th Result) लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर सुरू होते करिअर निवडीची (Career after 12th) चढाओढ. काही विद्यार्थ्यांना मात्र काही विषय नको असतात. त्यात गणित (Courses without Maths) हा विषय विद्यार्थ्यांना आवडत नाही. अनेक विद्यार्थी गणित विषय झेपणार नाही म्हणून शिक्षण सोडून देतात. अंतर आता चिंता अजिबात करू नका. आम्ही तुम्हाला काही कोर्सेसबदल माहिती देणार आहोत जे करून तुम्ही गणिताशिवाय करिअर करू शकता. चा तर जाणून घेऊया. हॉटेल मॅनेजमेंट बारावीनंतर आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये (Hotel Management) बॅचलर करू शकता. या कोर्स दरम्यान मोठ्या हॉटेल्समध्ये इंटर्नशिप देखील करण्याची संधी मिळते. जे चांगले प्रदर्शन देतात त्यांना हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरमध्येही स्पेशलायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, फूड अँड बेव्हरेजेस प्रॉडक्शन बॅचलर, हॉटेल मॅनेजमेन्टमध्ये बीबीए, कॅटरिंग मॅनेजमेन्ट मध्ये बॅचलर, पाक कला मध्ये बीए , हॉटेल मॅनेजमेंटमध्ये  बीए.असे कोर्सेस करू शकता. हे वाचा - Online Job शोधण्याचा प्रयत्न करताय? अशा पद्धतीनं करा सोशल मीडियाचा वापर ट्रॅव्हल अँड टुरिजम जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग (Traveling) आणि एक्सप्लोर करायला आवडत असेल तर बारावीनंतर ट्रॅव्हल अँड टुरिजम हा कोर्स घेऊ शकता. विशेष म्हणजे या कोर्समध्ये गणित हा विषय नसणार आहे. बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेड जर तुम्हाला बाजारपेठ समजून घ्यायची असेल, परदेशी व्यापार क्षेत्रात रस असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकेल. बारावीनंतर बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेडची निवड करा. ज्यामुळे तुम्ही ट्रेडिंग क्षेत्रात मोठं नाव मिळवू शकता. बॅचलर ऑफ लॉ कायद्याचा अभ्यास करण्याचा अर्थ असा नाही की आपण केवळ वकील (Lawyer) होऊ शकता. जवळपास सर्व मोठ्या कंपन्या सेक्रेटरीसाठी कायदेशीर सल्लागार नेमतात. जिथे सर्वोत्तम पगाराचे पॅकेज उपलब्ध आहे. देशाच्या विविध संस्थांमध्ये अनेक एकात्मिक विधी अभ्यासक्रमही चालवले जातात. हे वाचा - आता शिक्षणासोबतच कमवा पैसेही; ‘हे’ आहेत टॉप पार्ट टाइम जॉब्स; मिळेल भरघोस पगार इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) कंपन्यांची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या मोठ्या पार्टी, सेमिनार, लाइव्ह शो, कॉर्पोरेट मीटिंग्ज, गेट टू गेदर, प्रेस कॉन्फरन्स आयोजित करतात. त्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची मागणीही वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या