कॅनडा ही अनेकांची पहिली पसंती
मुंबई, 02 जानेवारी: परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं (Education in Abroad) अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करून आणि चांगले गुण मिळवून विध्यर्थ स्वतःला तयारही करतात. पण परदेशात शिक्षण (Study in Abroad) म्हंटलं की मोठ्या प्रमाणावर पैशांची उभारणी करावी लागते. जाण्यापासून राहण्यापर्यंतचा खर्च लाखो रुपये (Money for going abroad) असतो. सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे पालक इतके पैसे जमवू शकत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न बाजूला ठेऊन नोकरी करावी लागते. पण परदेशात शिक्षणासाठी तुम्ही काही बाहेरून आर्थिक मदत मिळवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. मग आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक (Money solutions while going abroad) मदत मिळवू शकता आणि परदेशात शिक्षणाला जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. युनिव्हर्सिटीजकडून स्कॉलरशिप मिळवा परदेशातील बर्याच युनिव्हर्सिटीज (Foreign Universities) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्यांना स्कॉलरशिप्स (Scholarships in Foreign Universities) देतात, यासाठी काही परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही या स्कॉलरशिप्स मिळवू शकता. काही युनिव्हर्सिटीजकडून स्पोर्ट्स कोटामधूनही (Sports Quota) स्कॉलरशिप्स दिल्या जातात. या युनिव्हर्सिटीज नक्की कोणत्या आणि स्कॉलरशिप्सचं स्वरूप काय हे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे. Career Tips: नवीन वर्षात करिअरमध्ये मिळेल मोठं यश; या महत्वाच्या गोष्टी वाचा पार्ट टाइम जॉब परदेशात शिक्षणासाठी तुम्ही पार्ट टाइम जॉब (Latest part time jobs) करू शकता. जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्याल तेव्हा युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला काही तास पार्ट टाइम जॉब करण्याची परवानगी दिली जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेत (Study in America) विद्यार्थ्यांना आठवड्यातून सुमारे 20 तास काम करण्याची परवानगी आहे. लक्षात ठेवा की आपण त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या विरूद्ध पार्ट टाइम जॉब करू नका. फ्री शिक्षण देणारे देश ब्राझील (Brazil), आइसलँड (Iceland), ग्रीस (Greece) आणि फ्रान्ससारख्या (France) देशांमध्ये विनामूल्य शिक्षण दिलं जातं. पैसे कमी असल्यास तुम्ही अशा काही देशांचा शिक्षणासाठी विचार करू शकता. इथे तुम्हाला शिकण्याचा खर्च येणार नाही. त्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील. अशा देशांमध्ये तुम्हाला फक्त राहण्याचा खर्च येईल हा खर्च तुम्ही पार्ट टाइम जॉब करून पूर्ण करू शकता. JOB ALERT: पुण्यातील ‘या’ आर्मी कॉलजेमध्ये विविध पदांसाठी भरती; होणार मुलाखत एज्युकेशन लोन बरेच लोक स्वत: च्या आर्थिक मदतीसाठी गोल्ड लोन (Gold Loan) किंवा पर्सनल लोन (Personal Loan)घेतात. पण तुम्हाला कमी खर्चात शिक्षण पूर्ण करायचं असेल तर Education Loan घेऊ शकता. इतर लोन्सच्या तुलनेत एज्युकेशन लोनवर व्याज कमी आहे. एज्युकेशन लोन केवळ आपल्या स्वत: च्या देशातच नाही तर परदेशातही दिलं जातं. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या लोनची परतफेड करावी लागते.