मुंबई, 01 सप्टेंबर : तुम्हाला भारतीय नौदलात काम करण्याची चांगली संधी आहे. नौदलात ग्रुप सी, नाॅन गॅजेटेड पदासाठी व्हेकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर. ग्रुप सीमध्ये ज्या पदांसाठी व्हेकन्सी आहे ती आहेत सफाई कामगार, पेस्ट कंट्रोल कामगार, कुक आणि फायर इंजिन ड्रायव्हर. या पदांसाठी सॅलरी पॅकेज 18 हजारापासून 69,100 रुपयापर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 30 वर्षापर्यंत हवं.अधिक माहिती पुढीलप्रमाणे - कुठल्या पदासाठी किती जागा? सफाई कामगार - 9 पदं पेस्ट कंट्रोल कामगार - 2 पदं कुक - 1 पद फायर इंजिन ड्रायव्हर - 1 पद SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी, वाचतील तुमचे पैसे शैक्षणिक पात्रता सफाई कामगार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाचा दहावी उत्तीर्ण हवा. पेस्ट कंट्रोल कामगारही दहावी असावा. त्याला हिंदी किंवा स्थानिक भाषा बोलता आली पाहिजे. फायर इंजिन ड्रायव्हरसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण हवा. जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव हवा. ड्रायव्हिंग लायसन्स हवं. एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज मिळणारा पगार सफाई कामगाराचा पगार 18 हजार ते 56,900 रुपयापर्यंत असेल. पेस्ट कंट्रोल कामगाराचा पगार 18 हजार ते 59,900 रुपयापर्यंत असेल. कुकचा पगार 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत असेल. फायर इंजिन ड्रायव्हरचा पगार 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत असेल. अधिक माहितीसाठी www.indiannavy.nic.in इथे संपर्क साधा. Success story: कॉर्पोरेट नोकरी सोडून त्याने केली यशस्वी फुलशेती तसंच,एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचवेळी एअर इंडियाने नोकरीसाठी जाहिरातही दिली आहे. इंजिनिअर्ससाठी ही चांगली संधी असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडियाने 311 जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत. इच्छुक उमेदवार www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठीची डेडलाइन 20 सप्टेंबरपर्यंत आहे. या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराचं वय 26 वर्ष हवं. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेसाठी इंजिनिअरींगची 4 वर्षांची पदवी किंवा AICTE चा मान्यताप्राप्त असलेला 3 वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा