मुंबई, 01 सप्टेंबर : तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. बाॅर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं अनेक पदांवर व्हेकन्सी काढलीय. ड्राफ्टसमॅन, हिंदी टायपिस्ट, सुपरवायझर स्टोअर आणि रेडिओ मेकॅनिकसह अनेक पदांवर भरती केली जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी www.bro.gov.in वर अर्ज करावा. एकूण 337 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. या पदांसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. 20 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवाराला सर्व अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन शैक्षणिक योग्यता, वयाची मर्यादा, शेवटची तारीख आणि इतर अपडेट्स तपासून पाहा. मगच अर्ज करा. सरकारी नोकरीत ग्रॅज्युएट्स आणि 12वी पासना संधी, 182 जागांवर भरती शैक्षणिक पात्रता ड्राफ्टसमॅन - कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12वी सायन्समध्ये उत्तीर्ण हवं. या क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव हवा. या पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षापर्यंत हवं. उमेदवाराला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळेल. नौदलात ‘या’ पदांसाठी व्हेकन्सी, पगार आहे 69,000 रुपयापर्यंत हिंदी टायपिस्ट - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिटच्या हिशेबानं स्पीड हवा. मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रॅज्युएशनची पदवी हवी. वयाची मर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत हवी. सुपरवायझर स्टोअर - या पदासाठी याच क्षेत्रातला 2 वर्षांचा अनुभव हवा. उमेदवाराला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळेल. एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज तसंच,भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात 182 जागांवर भरती केली जाईल. या जागा खेळाडूंसाठी ठेवल्यात. यात क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला) हे क्रीडा प्रकार आहेत. पद आणि पद संख्या लेखापाल, लेखा परीक्षक ( खेळाडू ) - 48 अकाउंटंट आणि क्लार्क - 134 NCPला आणखी एक धक्का; धनंजय महाडीक भाजपात प्रवेश करणार, पाहा पहिली प्रतिक्रिया!