JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Interview Tips: Online Interview देताना 'या' गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष; वाचा काही महत्त्वाच्या टिप्स

Interview Tips: Online Interview देताना 'या' गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष; वाचा काही महत्त्वाच्या टिप्स

अनेक उमेदवार ऑनलाइन मुलाखतीदरम्यान काही चुका करतात, त्यामुळे त्यांची निवड होत नाही. अशा सामान्य चुका जाणून घ्या

जाहिरात

चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 नोव्हेंबर: कोरोना संसर्गामुळे देश आणि जग बराच काळ लॉकडाऊनमध्ये होते. अशा स्थितीत नोकरीच्या क्षेत्रातही अनेक बदल होणे स्वाभाविक होते. कंपन्या ऑनलाइन भरतीवर (Online jobs) अवलंबून झाल्या आणि नोकरीची संपूर्ण प्रक्रियाही डिजिटल (Digital Interview) झाली. ऑनलाइन मुलाखतीची (Online interview Tips) प्रक्रिया काही उमेदवारांसाठी पूर्णपणे नवीन आहे आणि त्यांना त्यात फारसे सोयीचे वाटत नाही. जर तुम्ही देखील ऑनलाईन मुलाखतीची तयारी (How to prepare for Online Interview) करत असाल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात अनेक उमेदवार ऑनलाइन मुलाखतीदरम्यान काही चुका करतात, त्यामुळे त्यांची निवड होत नाही. अशा सामान्य चुका जाणून घ्या बॉडी लँग्वेज महत्त्वाची तुम्ही ज्या कंपनीची मुलाखत घेणार आहात त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या. ती कंपनी कोणत्या क्षेत्रात डील करते हे तुम्हाला माहीत असायला हवे. ऑनलाइन मुलाखती दरम्यान, सरळ बसा आणि सकारात्मक वृत्तीने बोला, तुमच्या देहबोलीकडे लक्ष द्या. टेक्नॉलॉजिकल चुका होऊ देऊ नका डिजिटल इंटरव्ह्यू दरम्यान अनेक वेळा तांत्रिक अडचणी येतात. अशा वेळी स्वत: काहीही बोलण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐका. मुलाखत सुरू करण्यापूर्वी, डिव्हाइस आणि त्याची सेटिंग्ज तपासा. मायक्रोफोन, वेबकॅम, ऑडिओ-व्हिडिओ सेटिंग, इंटरनेट सेटिंग, इंटरनेट कनेक्शन आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्म पूर्णपणे तपासा. Exam Tips: कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा… स्पष्ट आवाजात उत्तरं द्या खूप सकारात्मक विचार करून प्रश्नांची उत्तरे द्या. आवाज अगदी स्पष्ट ठेवा जेणेकरुन समोरच्या व्यक्तीला तुमचे म्हणणे आणि उत्तरे ऐकण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पार्श्वभूमीत कोणताही आवाज किंवा गोंधळ नाही याची खात्री करा. नेहमी मायक्रोफोनचा उपयोग करा ऑनलाइन मुलाखत देताना नेहमी मायक्रोफोन वापरा. फोन किंवा लॅपटॉपवर मुलाखत देताना तुमचे डिव्हाइस लाऊडस्पीकरवर ठेवू नका. लाउडस्पीकर चालू केल्याने, पार्श्वभूमीचा आवाज तुमच्या मुलाखतीमध्ये अडथळा आणू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या