JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Exam Tips: विद्यार्थ्यांनो, पहाटे उठून अभ्यास करताना डोळे लागतात? मग 'या' टिप्समुळे येणार नाही झोप

Exam Tips: विद्यार्थ्यांनो, पहाटे उठून अभ्यास करताना डोळे लागतात? मग 'या' टिप्समुळे येणार नाही झोप

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कधीच पहाटे झोप (How to avoid sleep at early morning) येणार नाही.

जाहिरात

3. स्टडी रूमचे दार पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावावे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी: फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिने म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सर्व प्रकारच्या परीक्षा (Exam Tips) आणि अभ्यास येतो. या काळात नुकताच हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाला असतो. त्यामुळे वातावरणात थंड हवा आणि थोडी थंडी असते. अनेक विद्यार्थी रात्री उशिरा जागून अभ्यास न करता सकाळी उठून अभ्यास (Benefits of early morning study) करणं पसंत करतात. मात्र या थंडीमुळे पहाटे उठून अभ्यासाला बसल्यावरही डोळे लागतात म्हणजेच झोप (How to avoid sleep for study) येते. विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आणि झोपण्यातच जास्त वेळ जातो. या सगळ्यांचा परिणाम अभ्यासावर आणि निकालावर होतो. मात्र आता चिंता करू नका. तुम्हालाही पहाटे अभ्यास (Early Morning Study) करताना झोप येत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कधीच पहाटे झोप (How to avoid sleep at early morning) येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. खोलीतील लाईट मोठा ठेवा सकाळी उठल्यानंतर अनेक विद्यार्थी केवळ स्टडी लॅम्प लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. एका लॅम्पमुळे बाकीची खोली जवळजवळ अंधारातच राहते. या कमी प्रकाशात आणि शांत वातावरणात झोप लागणे स्वाभाविक आहे. अशा वेळी स्टडी रूमचा लाईट मोठा ठेवा. यामुळे तुम्हाला झोप येणार नाही. अभ्यास सोडून तुमची मुलं स्मार्टफोनवर चुकीचं तर करत नाही ना? असं ठेवा लक्ष बेडवर अभ्यास करू नका अनेकजण सकाळी उठल्यानंतर बेडवर बसून अभ्यासाला सुरुवात करतात. हे तुम्हाला आळशी बनवू शकते. तुम्ही झोपून हळू हळू वाचण्याचा प्रयत्न कराल आणि मग झोप येईल. त्यामुळे अभ्यास करताना नेहमी खुर्चीवर पाठ सरळ करून बसावे. समोर टेबल ठेवा आणि पुस्तक मांडीवर न ठेवता समोरच्या टेबलावर ठेवा. खुर्चीवर बसूनही काही वेळाने हात किंवा पाय हलवत राहा. हे तुम्हाला सक्रिय ठेवेल. सतत पाणी प्या सकाळी उठल्यानंतर पाणी प्या. तसेच अभ्यासादरम्यानही काही वेळाने पाणी प्यावे. हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर ठरेल. यामुळे वारंवार उठून शौचालयात जावे लागेल, ज्यामुळे तुमच्या शरीरातील निष्क्रियता कमी होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल. तसेच जास्त पाणी प्यायल्याने मन हायड्रेट आणि ताजेतवाने राहते. Vastu Tips: मुलांच्या खोलीतून आताच बाहेर काढा ‘या’ गोष्टी; परीक्षेत करतील टॉप तोंडावर पाणी शिंपडा परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून झोप लागली, तर सकाळी उठणे कठीण जाते. थकलेल्या मनाने अभ्यास केला की पुन्हा पुन्हा झोप येते. जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर लगेच उठून बाथरूममध्ये जा आणि चेहऱ्यावर पाणी शिंपडा. यामुळे तुमची आळस आणि तंद्री दूर होईल आणि तुमचे मन अभ्यास करण्यासाठी सक्रिय होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या