मुंबई, 11 सप्टेंबर : ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! आता भारतीय विद्यार्थी शिक्षणानंतर 2 वर्ष तिथे काम करू शकतात. ब्रिटन सरकारनं परदेशी विद्यार्थ्यांसाठी वर्क विजा 2 वर्षांनी वाढवलाय. ब्रिटिश युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या देशातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढची 2 वर्ष नोकरी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी रोजगारसंबंधी प्रक्रिया कशी चांगली करता येईल, याचा विचार ब्रिटन सरकार करतंय. ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार ब्रेग्जिट (Brexit)नंतर दुसऱ्या देशातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं हे पाऊल उचललंय. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या देशातले विद्यार्थी ब्रिटनमध्ये राहून दोन वर्ष काम करू शकणार आहेत. या योजनेची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी केली. MMRDA Recruitment 2019 : इंजिनीयर्ससाठी मेट्रोमध्ये बंपर व्हेकन्सी शिक्षण विभागानं सांगितलं, ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ब्रिटन त्यांचं स्वागत करतं. अण्डर ग्रॅज्युएट आणि मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट स्टडी सुट्टीचा कालावधी आता 6 महिन्यांनी वाढवलाय. तर डाॅक्टरेट करणाऱ्यांसाठी हा अवधी 1 वर्षाचा केलाय. मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज घोषणापत्रात असंही म्हटलंय की, सरकार अर्जाच्या प्रक्रियेला अजून चांगलं बनवेल. याबरोबर विद्यार्थी रोजगारासाठी सरकार पूर्ण समर्थन देईल. 2012मध्ये या स्कीमला मागे घेतलं होतं. त्यावेळी थेरेसा ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, ‘अशी’ होईल निवड त्यामुळे आता ब्रिटिश युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही बातमी म्हणजे एक पर्वणीच आहे. शिक्षणानंतर नोकरीचाही अनुभव आता घेता येईल. VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद