JOIN US
मराठी बातम्या / करिअर / CBSE Result 2020 : दहावीचा निकाल जाहीर, वाचा कुठे आणि कसा पाहता येईल

CBSE Result 2020 : दहावीचा निकाल जाहीर, वाचा कुठे आणि कसा पाहता येईल

नवी दिल्ली, 15 जुलै : CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात. जे विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठी SMSची सुविधाही उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा निकाल नोंदणीकृत मोबाईलनंबर आणि ई-मेलवरही पाहता येणार आहे. यासाठी 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै : CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.

जे विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठी SMSची सुविधाही उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा निकाल नोंदणीकृत मोबाईलनंबर आणि ई-मेलवरही पाहता येणार आहे. यासाठी 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल. स्पेस <रोल नंबर> स्पेस <एडमिट कार्ड आईडी> याशिवाय फोनवरूनही विद्यार्थ्यांना निकालाची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दिल्लीतील विद्यार्थ्यांना 24300699 तर दिल्ली व्यतिरीक्त देशभरातील विद्यार्थी 11-224300699 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. CBSE चे निकाल पाहण्यासाठी आपण cbse.nic.in, www.results.nic.in किंवा www.cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या