JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: विद्यार्थ्यांनो, IAS Officer होणं कठीण नाही; फक्त 'या' टिप्सचं तंतोतंत पालन करणं आवश्यक

Career Tips: विद्यार्थ्यांनो, IAS Officer होणं कठीण नाही; फक्त 'या' टिप्सचं तंतोतंत पालन करणं आवश्यक

आज आम्ही तुम्हाला UPSC परीक्षेच्या तयारीसाठी आणि IAS होण्यासाठी काही खास टिप्स (Tips to become IAS Officer) देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

IAS होण्यासाठी काही खास टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 फेब्रुवारी: UPSC परीक्षा ही देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित परीक्षा (UPSC Preparation Tips) मानली जाते. यात तीन टप्पे आहेत – UPSC प्रिलिम्स परीक्षा (UPSC Prelims 2022), UPSC मुख्य परीक्षा 2022 (UPSC Mains Exam 2022) आणि मुलाखत फेरी (UPSC Interview tips). या तिन्ही टप्प्यांमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची IAS, IPS किंवा IFS सेवेसाठी निवड केली जाते. आपणही IAS (How to become IAS Officer) किंवा IPS ऑफिसर होऊन देशाची सेवा करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र त्यासाठी नक्की तयारी कशी करावी? (How to Prepare for IAS Interview) नक्की अभ्यासाला कुठून सुरुवात करावी? (How to start Study for UPSC) याबद्दल अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला UPSC परीक्षेच्या तयारीसाठी आणि IAS होण्यासाठी काही खास टिप्स (Tips to become IAS Officer) देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. दरवर्षी देशभरातून लाखो तरुण UPSC परीक्षा देण्यासाठी सहभागी होतात. पण त्यातील काही मोजकेच यशस्वी होऊनIAS होतात. यूपीएससी परीक्षा सर्व दृष्टिकोनातून खूप कठीण आहे. हे उत्तीर्ण होण्यासाठी तरुणांना विशेष नियोजन आणि तयारीची गरज असते. म्हणून च या परीक्षेची तयारी करताना विशेष नियोजन आणि अभ्यासाची गरज असते. तसंच आत्मविश्वासाचीही गरज असते. Career Tips: भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी कशी असते Selection Process? वाचा IAS ची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षेसाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःची मानसिक तयारी केली असेल तर तुमच्यात ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा आत्मविश्वास येईल आणि तुम्ही इस होऊ शकाल. तसंच IAS होण्यासाठी ध्येय निश्चित करणे आणि प्रभावीपणे वेळ देणे आवश्यक आहे. जर तुम्ही काम करत असाल आणि तुमची नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्ही अभ्यासासाठी कसा वेळ द्याल आणि योजना कशी तयार कराल याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. क्या बात है! IAS अधिकाऱ्यांना मिळते मिळते VVIP ट्रीटमेंट; सुविधांबद्दल वाचाच IAS अधिकारी होण्यासाठी वेळापत्रक तयार करणेही आवश्यक आहे. अभ्यासक्रम हा कोणत्याही परीक्षेचा आत्मा असतो म्हणून संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. पुस्तके वाचण्यापूर्वी अभ्यासक्रम जाणून घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उमेदवारांनी UPSC नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम जाणून घेतल्याने तुम्हाला संबंधित अभ्यास सामग्री निवडण्यात, विषयांना प्राधान्य देण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या