एसबीआयच्या अहवालानुसार यंदा `अशी` असेल जॉब मार्केटची स्थिती
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : देशातील अनेक राज्यांत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) कहर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर फारच विदारक स्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. याचा थेट परिणाम सर्वच घटकांवर झाला. गेल्या दीड ते दोन वर्षांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसला. या काळात अनेकांना आपली नोकरी किंवा रोजगार (Jobs) गमवावा लागला. उद्योगांवरही विपरित परिणाम झाला. सध्या कोरोनाची दुसरी लाट निवळताना दिसत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जून अखेरच्या तिमाहीत 20.10 टक्के वाढ नोंदली गेली आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्यानं जॉब मार्केटमध्ये (Job Market) चित्र बदलताना दिसत आहे. रोजगारांसंबंधी ही स्थिती अशा वेळी व्यक्त केली गेली आहे की जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारांची संख्या वाढत असून, अर्थव्यवस्थेत कामगारांचा सहभाग कमी होण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या वर्षात रोजगार संधी आणि जॉब मार्केटची स्थिती कशी असेल, या विषयी एसबीआयने (SBI) नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालाबाबतचं वृत्त ` टीव्ही नाइन हिंदी `नं दिलं आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कामगार बाजारातील घडामोडींमध्ये सुधारणा दिसेल आणि महामारी कमी झाल्याने कंपन्या कामगार भरती (Recruitment) योजना सुरू करतील, असा विश्वास देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि नवीन पेन्शन योजनेव्दारे नियमितपणे जारी करण्यात आलेल्या मासिक वेतन नोंदणी डेटाचा संदर्भ दिला आहे. पगार अवघा 5 हजार आणि कोटींचं ‘साम्राज्य’; सत्य समोर आल्यानंतर अधिकाराही हैराण यानुसार, जर नव्या नोकऱ्यांची संख्या अशीच वेगात वाढत राहिली तर 2020-21 मध्ये 44 लाख असलेली ही संख्या 2021-22 मध्ये 50 लाखांपुढे जाईल. अर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत ईपीएफओ ग्राहकांची निव्वळ संख्या वाढली आहे. याचाच अर्थ असा की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फारसा परिणाम जॉब मार्केटवर झाला नसल्याचं दिसून येतं. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (NPS) म्हणण्यानुसार, केवळ ऑगस्ट महिन्यात 15 लाख भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागली होती. यातील 13 लाख बेरोजगार ग्रामीण भागातील होते. देशातील रोजगाराच्या अभावाविषयी विविध क्षेत्रांमधून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ईपीएफओ आणि एनपीएसच्या रोजगाराच्या आकडेवारीवर टीका करण्यात आली आहे. कारण ती केवळ संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांपुरती मर्यादित आहे. परंतु, असंघटित क्षेत्रात सर्वाधिक काम होत आहे. पठ्याने तरुणी बनवणूक FB वर डॉक्टराला जाळ्यात ओढले अन् 2 कोटी कॅश मागवले चालू अर्थिक वर्षात जॉब मार्केटमधील चित्र चांगले असेल. कंपन्या आपल्या कामगार भरती योजना पूर्ववत सुरू करतील. क्षेत्राला संघटित रुप देण्याचा दर 10 टक्के आहे. नवीन नोकऱ्यांच्या एकूण नियमित रोजगाराचे (पेरोल) गुणोत्तर 50 टक्के आहे. प्रत्येक दोन नव्या नोकऱ्यांमध्ये एका नियमित नोकरीची भर पडत असल्याचे यावरून दिसते. 2020-21 या अर्थिक वर्षात हे प्रमाण 47 टक्के होते. याचाच अर्थ यात सुधारणा होत आहे. एसबीआयच्या अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, जून तिमाहीत 30.74 कोटी नियमित नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. यात 16.7 लाख नोकऱ्या या नव्या असून त्या प्रथमच ईपीएफओ किंवा एनपीएसकडे नोंद झाल्या असल्याचं, प्रमुख अर्थशास्त्रज्ञ सौम्य कांती घोष यांनी एका लेखात म्हटलं आहे.