मुंबई, 24 नोव्हेंबर : सध्या बाजारात अनेकविध फीचर्स असणारी स्मार्टवॉच (Smartwatch) विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे गरजेनुसार आणि फीचरनुसार ग्राहकांना स्मार्टवॉचेसचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टवॉचेसच्या माध्यमातून युझर्सना हार्ट रेट, SPo2, झोपेचा पॅटर्न, स्ट्रेस लेव्हल आदींची माहिती मिळवणं सोपं जातं. ग्राहकांना आता विशेष फीचर्स असलेल्या अजून एका स्मार्टवॉचचा पर्याय उपलब्ध झाला आहे. Noise X-Fit1 हे स्मार्टवॉच भारतात सादर करण्यात आलं आहे. युझर्स अमेझॉन इंडियावरून (Amazon India) हे स्मार्टवॉच प्री-ऑर्डर करू शकतात. लॉंचिंगच्या निमित्तानं हे स्मार्टवॉच अमेझॉन इंडिया वेबसाइटवर 2999 रुपये, तर नॉइजच्या (Noise) वेबसाइटवर 5999 रुपयांना उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच 26 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयताकृती असलेल्या या स्मार्टवॉचला सिंगल साईड बटण आणि सिलिकॉन स्ट्रॅप आहे. मेटल फिनिशिंग असलेल्या या स्मार्टवॉचचं वजन 30 ग्रॅमपेक्षा कमी आहे. अशी आहेत स्मार्टवॉचची फीचर्स : Noise X-Fit 1 स्मार्टवॉचमध्ये एक SpO2 ट्रॅकर फीचर (Feature) आहे. या फीचरच्या मदतीनं युझरला शरीरातली ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) ट्रॅक करता येणार आहे. Noise X-Fit 1 स्मार्टवॉचमध्ये IP68 रेटिंगसह स्प्लॅश आणि स्वेट रेसिस्टन्ससारखी फीचर्सदेखील आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 1.52 इंचाचा IPS True view डिस्प्ले (Display) देण्यात आला आहे. स्मार्टवॉचचा सिलिकॉन स्ट्रॅप पारंपरिक बकल क्लोजरसह देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच युझरच्या रक्तातली ऑक्सिजन पातळी, हार्ट रेट, झोपेचा पॅटर्न, स्ट्रेस लेव्हल याची निरीक्षणं नोंदवू शकणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये क्विक रिप्लाय (Quick Reply) आणि स्मार्ट DND ही फीचर्सदेखील देण्यात आली आहेत.
किंमत काय आहे? या वर्षाच्या सुरुवातीला भारतात Noise Fit Core हे केवळ 2999 रुपयांत लॉंच करण्यात आलं होतं. यात ब्लॅक आणि सिल्व्हर असे रंगांचे दोन पर्याय उपलब्ध होते. नॉइज कोअर स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा डिस्प्ले असून, त्याचं रिझॉल्युशन 240*240 पिक्सेल आहे. डायलच्या उजव्या बाजूला सिंगल क्राउन बटण असून, या स्मार्टवॉचची बॉडी झिंक अलॉय मेटलची आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर आणि हेल्थ सेन्सर (Health Sensor) देण्यात आले आहेत. तसंच या स्मार्टवॉचमध्ये 13 स्पोर्ट्स मोडदेखील (Sports Mode) समाविष्ट आहेत. हे स्मार्टवॉच अँड्रॉइड 7 (Android 7) किंवा आयओएस 9.0 (iOS 9.0) यापुढील व्हर्जनला कनेक्ट करता यावं साठी त्यात अँड्रॉइड डिव्हाइस देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ 10 दिवसांची आहे. तसंच बॅटरीची क्षमता 210 mAh आहे. एकदा हे स्मार्टवॉच चार्ज केल्यानंतर 7 दिवस आणि स्टँडबाय मोडवर 30 दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, असा दावा कंपनीनं केला आहे.