JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / सर्वात महागडी रॉयल एनफील्ड बुलेट! बाइकच्या किमतीत येईल नवीन स्कॉर्पिओ

सर्वात महागडी रॉयल एनफील्ड बुलेट! बाइकच्या किमतीत येईल नवीन स्कॉर्पिओ

या बाईकच्या किमतीमध्ये तुम्ही Scorpio-N किंवा Hyundai Creta सारखी कार खरेदी करू शकता.

जाहिरात

या बाईकच्या किमतीमध्ये तुम्ही Scorpio-N किंवा Hyundai Creta सारखी कार खरेदी करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : रॉयल एनफिल्ड कंपनी माहीत नसलेला बाईकप्रेमी व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. इतकच काय पण प्रत्येकाला कधी ना कधी बुलेट चालवण्याची इच्छा असते. रॉयल एनफिल्ड बाइक्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाइक्स 350 सीसी सेगमेंटमध्ये बेस्ट सेलर आहेत. याशिवाय, कंपनी 650 सीसी कॉन्टिनेंटल जीटी 650 देखील विकते. पण तुम्हाला माहित आहे का रॉयल एनफिल्डच्या सर्वात महागड्या बाईकची किंमत किती आहे. अलीकडेच एक सुधारित रॉयल एनफील्ड बाईक सोशल मीडियावर समोर आली आहे. या बाईकची किंमत तुमची झोप उडवू शकते. या बाईकच्या किमतीमध्ये तुम्ही Scorpio-N किंवा Hyundai Creta सारखी कार खरेदी करू शकता. या बाईकची किंमत 13 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या बाईकचे फीचर्स. या सर्वात महागड्या Royal Enfield Continental GT 650 चा व्हिडिओ BikeWithGirl नावाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बंगळुरूच्या ग्रीस हाऊस कस्टम्सने या बाईकमध्ये बदल करून नवीन लूक दिला आहे. मोडिफिकेशनचा उद्देश ह्या बाईकला सर्वात वेगवान ड्रॅग बाईक बनवणे हा आहे. बाइकचा टॉप स्पीड 174 किमी प्रति तास दरापर्यंत सांगितला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाईकने डुकाटी 848 ला ड्रॅग रेसमध्येही पराभूत केले. वाचा - लोकं वजनावरुन उडवायचे खिल्ली, तिनं कामातून दिलं उत्तर! बाईक रायडर साईलीची inspirational स्टोरी पॉवरफुल इंजिन मोडिफिकेशनची सुरुवात गाडीच्या इंजिनपासून सुरू झाली.  स्टँडर्ड GT 650 ची शक्ती 48bph च्या जवळ असताना, या बाईकची शक्ती 62bph पर्यंत वाढवण्यात आली आहे. बाईकचे वजन कमी करण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. पुढच्या बाजूने या बाईकला पूर्णपणे फेयर्ड डिझाइन देण्यात आले आहे. एक्झॉस्टपासून टायरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये टायटॅनियम बोल्टचा वापर करण्यात आला आहे, जे वजनाने खूपच हलके आहेत आणि त्यामुळे बाईकचे वजन 208KG वरून 160kg वर आले आहे. रॉयल एनफील्ड कंपनीच्या बाईक्स ह्या लाँग राईडसाठी जास्त वापरल्या जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या