JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / बाईक झटके मारुन बंद पडली तर या पार्टमध्ये झाला असेल बिघाड, चालू करण्याचा उपाय वाचा

बाईक झटके मारुन बंद पडली तर या पार्टमध्ये झाला असेल बिघाड, चालू करण्याचा उपाय वाचा

पावसाळ्यात बाईक चालवताना तुमची बाईक झटके मारुन थांबली तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील एक मोठे कारण म्हणजे स्पार्क प्लगचा बिघाड.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून : पावसाळा आला की वाहन चालकांची धाकधूक वाढायला लागते. कारण, पावसाळ्यात कधी गाडी बंद पडेला काही सांगता येत नाही. तुमच्याकडे दुचाकी असो वा चारचाकी, त्यांची सर्व्हीस नेहमीच आवश्यक असते. समजा तुम्ही बाईकवरून जात असाल आणि चालत असताना तुमची बाईक झटका देऊन थांबली आणि नंतर सुरू होण्यास त्रास होऊ लागला तर काहीतरी गडबड आहे असे समजावे. कधीकधी ही चूक स्पार्क प्लगमधील दोष देखील असू शकते. आज आम्ही तुम्हाला या समस्येतून कसे बाहेर पडायचे ते सांगणार आहोत. स्पार्क प्लग हा इंजिनचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्याची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात स्पार्क प्लग खराब होणे हे सामान्य आहे. स्पार्क प्लगमध्ये बर्‍याचदा घाण साचते, जी साफ करणे खूप महत्वाचे आहे, अनेकदा तेलाचे अवशेष त्यात चिकटतात, ज्यामुळे ते योग्यरित्या स्पार्क होत नाही आणि इंजिन सुरू होण्यास अडचण येते. तसेच अनेक वेळा स्पार्क प्लग खराब होऊन इंजिन सुरू होत नाही. त्यामुळे बाईकमध्ये बसवलेला स्पार्क प्लग बदलणे आवश्यक आहे. दर दोन हजार किलोमीटर किंवा त्याआधी तपासा, काही दोष दिसल्यास तो बदलणे शहाणपणाचे आहे, अन्यथा नंतर अडचणी येतील. स्पार्क प्लग अशाप्रकारे बदला स्पार्क प्लग बदलण्यासाठी सर्व्हिस सेंटर किंवा चांगल्या मेकॅनिकची मदत लागत असते. मात्र, या दोन्ही सुविधा नसलेल्या ठिकाणी तुम्ही अडकला तर काळजी करू नका. प्लग तुम्ही स्वतः बदलू शकता. पण लक्षात ठेवा तुमच्याकडे अतिरिक्त स्पार्क प्लग असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम बाईकचा स्पार्क प्लग उघडा आणि तो बाहेर काढा, यासाठी तुम्ही स्पार्क प्लग स्पॅनर वापरू शकता. स्पार्क प्लगच्या टोकाच्या आजूबाजूला तेलाचे अवशेष किंवा काळे डाग दिसल्यास, इंजिन योग्य स्थितीत कार्य करत नसले पाहिजे. हरवलेला Smartphone कसा परवत मिळवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक आणि टिप्स! स्पार्क प्लग बदलताना सावधगिरी बाळगा स्पार्क प्लग साफ करण्यासाठी, ते पेट्रोल किंवा केरोसीनने स्वच्छ करा. कापडाने साफ केल्यास कापड कोरडे असावे. लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की इलेक्ट्रोड्समध्ये योग्य अंतर देखील असले पाहिजे. सामान्यतः इलेक्ट्रोडमध्ये 0.8 मिमी ते 1.2 मिमी अंतर असते. स्पार्क प्लग घालताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, त्याला जास्त घट्ट करू नका अन्यथा तो तुटू शकतो किंवा त्याचे थ्रेडिंग खराब होऊ शकते. आजकाल बाइक्समध्ये दोन स्पार्क प्लग असतात. इंजिनमध्ये बसवलेले दोन्ही स्पार्क प्लग एकाच कंपनीचे असतील तर बरे होते असे तज्ञांचे मत आहे. बाईकमध्ये (125cc) लावलेल्या स्पार्क प्लगची किंमत 75 ते 80 रुपयांपर्यंत आहे. वेळेवर वाहन तपासून घ्या गाडी धुताना आणि पावसाळ्याच्या दिवसात पाणी बाईकच्या इंधन टाकीमध्ये जाते, त्यामुळे बाईक सुरू होत नाही, अशावेळी तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जाण्यावाचून पर्याय राहत नाही. याशिवाय बाईकच्या कमकुवत बॅटरीमुळे बाईक सुरू करताना अडचण येत असेल, तर बाईकची बॅटरी वेळोवेळी तपासली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या