EV: वाह! ‘या’ राज्यांमध्ये Electric वाहन खरेदीवर मिळते प्रचंड सवलत, जाणून घ्या सरकार किती देतं सबसिडी
मुंबई, 14 जुलै : भारत सरकारनं 2070 पर्यंत देशाला ‘नेट झिरो एमिशन’ (Net Zero Emission) करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारकडून या दिशेनं अनेक सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे, जेणेकरून लोकांचा त्याकडे कल वाढेल. देशातील केंद्र तसेच राज्य सरकारं लोकांना इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicle) खरेदी करण्यासाठी सबसिडी (Subsidy on Electric Vehicle) देत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांवर वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर उपलब्ध असलेल्या या सबसिडीमुळे तुम्ही तुमचे बरेच पैसे वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा राज्यांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर जबरदस्त सूट मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर किती सबसिडी मिळते? (Subsidy on Electric Vehicle in Maharashtra?)- महाराष्ट्रात, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 5000 रुपये प्रति किलोवॅट या दराने अनुदान मिळत आहे. जर तुमचं नाव पहिल्या 10 हजार ग्राहकांमध्ये असेल, तर अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास, तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. हे वाचा - Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सवलत; सरकार देतंय सबसिडी याशिवाय राज्यात दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर भरघोस अनुदान आहे. येथे तुम्हाला दुचाकी खरेदीवर स्क्रॅपिंगवरही चांगली सूट मिळत आहे. दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर किती सबसिडी मिळते? (Subsidy on Electric Vehicle in Delhi)- तुम्ही दिल्लीत रहात असाल आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असाल तर अशा स्थितीत सरकारकडून ते खरेदी केल्यावर तुम्हाला प्रति किलोवॅट 10 हजार रुपये अनुदान मिळत आहे. याशिवाय, जर तुमचे नाव पहिल्या 1000 ग्राहकांमध्ये असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. दुसरीकडे, दुचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरही तुम्हाला प्रति किलोवॅट 5 हजार रुपये दराने अनुदान मिळत आहे. येथे तुम्हाला स्क्रॅपिंग प्रोत्साहन देखील मिळत आहे.