मुंबई, 4 सप्टेंबर : सणासुदीच्या हंगामात तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या महिन्यात तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी मोफत घेऊन जाऊ शकता. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Hero Electric या महिन्यात एक खास ऑफर घेऊन आली आहे. ओणम ऑफर अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या प्रत्येक 100व्या ग्राहकाला ही ऑफर मिळेल. म्हणजेच 100 स्कूटर विकल्यावर कोणत्याही एका ग्राहकाला Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर मोफत दिली जाईल. ही ऑफर फक्त केरळच्या ग्राहकांसाठी आहे.
आधार कार्डबाबत ‘ही’ चूक अनेकजण सर्रासपणे करतात; तुम्ही फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
AU Small Bank सोबत भागीदारी हिरो इलेक्ट्रिकने या वर्षाच्या सुरुवातीला देशभरात 1000 टचपॉइंट्स तयार करण्यासाठी केरळमधील मल्लापुरम येथे आपली सर्वात मोठी डीलरशिप सुरू केली. हिरोने इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या खरेदीसाठी AU Small Bank सोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून स्कूटर सुलभ हप्त्यांवर खरेदी करता येईल. या ऑफरबद्दल हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले की, देशात EVची खरेदी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केरळमधील सणांची सुरुवात ओणमपासून होते. ईव्हीबाबत ग्राहकांची मानसिकता बदलण्याची हीच उत्तम वेळ आहे. Investment Tips: आर्थिक स्थैर्यासाठी टाळा अनावश्यक खर्च, या टिप्स तुम्हाला मदत करतील हिरो इलेक्ट्रिकची विक्री हिरोने जुलै 2022 मध्ये 8786 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. कंपनीने वर्षभरात 108.05% ची मजबूत वाढ नोंदवली आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीने 4223 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या. म्हणजेच जुलै 2022 मध्ये कंपनीने आणखी 4563 ई-स्कूटर विकल्या. त्याचप्रमाणे, ओकिनावाने 213.68% च्या वार्षिक वाढीसह 8093 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. ओकिनावा हीरोला भारतीय बाजारपेठेत जोरदार टक्कर देत आहे.