Electric Vehicles: आता पेट्रोल-डिझेल कारच्या किमतीत घेता येईल इलेक्ट्रिक कार, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई 1 ऑगस्ट : देशात महागाईनं कळस गाठलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य माणूस आता हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत सरकार दररोज पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर भर देत आहे. एवढंच नाही तर देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicles) अधिक भर देत आहे. त्यामुळे जुनी डिझेल-पेट्रोल वाहनंही जप्त करण्यात येत आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्यानं उच्च वर्गातील लोकच त्यांची खरेदी करत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता इलेक्ट्रिक वाहनं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला पंख मिळण्याबरोबरच नवीन वर्षात वाहनांच्या विक्रीलाही वेग येणार आहे. चार्जिंग पॉईंट्स वाढवण्यावर सरकारचा भर- केंद्रीय मंत्री गडकरी, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि FY21 AGM च्या वार्षिक अधिवेशनात संबोधित करताना म्हणाले होते की, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती त्यांच्या पेट्रोल प्रकारांच्या बरोबरीच्या पातळीवर येतील. ते म्हणाले की सरकार ईव्ही चार्जिंग सुविधा वाढविण्याचं काम करत आहे. गडकरी पुढे म्हणाले की, आम्ही 2023 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात क्रांती घडवून आणण्याचं काम करू. यामुळे सरकार प्रमुख महामार्गांवर 600 हून अधिक चार्जिंग पॉइंट उभारत आहे. चार्जिंग पॉइंट करण्यासाठी सरकार निविदा काढणार आहे. हेही वाचा- ITR Verification: मुदत संपली तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? कारवाई टाळण्यासाठी करा ‘हे’ काम खर्च होईल कमी- अलीकडच्या काळात भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी इलक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. परंतु तरीही पेट्रोल आणि डिझेल वाहनांची संख्याही कमी नाही. त्यामुळंच नितीन गडकरी यांनी सांगितलं की, इलेक्ट्रिक वाहनांची प्रति किमी किंमत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत निम्म्याहून कमी असेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते म्हणाले की काही इलेक्ट्रिक वाहने देखील केवळ 1 रुपये प्रति किमी दराने प्रवास करतील. अवघ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणार आहे. निवडणूक सभा आणि टीव्ही चॅनेल्सच्या मुलाखतींमध्ये परिवहन मंत्री म्हणाले की, लवकरच ते इलेक्ट्रिक वाहनांवर काही अनुदानाची तरतूद करणार आहेत. मात्र, अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. मात्र विभागात विद्युत क्रांती घडवून आणण्यासाठी काही निर्णय घेण्याचा विचार केला जात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.