JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / चप्पल घालून बाईक चालवल्यास होतो दंड, कपडे घालण्यासंदर्भातही आहेत नियम

चप्पल घालून बाईक चालवल्यास होतो दंड, कपडे घालण्यासंदर्भातही आहेत नियम

देशात दुचाकीस्वारांसाठी सुरक्षेचे अनेक नियम करण्यात आले आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांश मोटारसायकलस्वारांना वाहतूक नियमांची फारशी माहिती नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशात वाहतूक नियमांबाबत वाद सुरू झाला आहे. आता सरकार कारमध्येही मागच्या सीटवर सीट बेल्ट लावणे अनिवार्य करणार आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. दर चार मिनिटांनी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागतो. एका आकडेवारीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांपैकी बहुतांश दुचाकीस्वारांचा समावेश आहे. आपण वाहन चालवतो, पण अनेकवेळा त्याचे नियम आपल्याला माहीत नसतात. देशात दुचाकीस्वारांसाठी सुरक्षेचे अनेक नियम करण्यात आले आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांश दुचाकीस्वारांना वाहतूक नियमांची फारशी माहिती नाही. येथे आम्ही तुम्हाला असाच एक नियम सांगत आहोत, तो म्हणजे तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवू शकत नाही. असे झाल्यास, वाहतूक पोलीस तुमचे चलन कापून घेऊ शकतात. वाचा - #कायद्याचंबोला: DND अ‍ॅक्टिवेटनंतरही यायचे कॉल! पुण्याच्या युवकाला तब्बल 1 लाख 80 हजारांची नुकसान भरपाई किती दंड होतो? मोटार वाहन कायद्यानुसार चप्पल, सँडल किंवा फ्लोटर घालून दुचाकी चालवणे हा गुन्हा मानला जातो. यामागील कारण म्हणजे या प्रकारच्या पादत्राणांमुळे ग्रीप कमकुवत होते आणि पाय घसरतात. तसेच, दुचाकीचे गीअर्स शिफ्ट करताना, अशा प्रकारच्या पादत्राणांमुळे पाय घसरून अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत दुचाकी मालकाचे एक हजार रुपयांपर्यंतचे चलन कापले जाऊ शकते.

बाइकवर ड्रेस कोडचीही घ्यावी लागते काळजी याशिवाय बाईक चालवताना ड्रायव्हरने योग्य ड्रेस कोडची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मोटरसायकल चालवताना पॅंट, शर्ट किंवा टी-शर्ट घालावे. जे शरीर पूर्णपणे झाकतात. कोणतीही दुर्घटना घडल्यास या कपड्यांमुळे शरीर काही प्रमाणात सुरक्षित राहू शकते. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुमचे 2000 रुपयांपर्यंतचे चलन कापले जाऊ शकते. त्यामुळे बाईक चालवताना हा नियम नक्की पाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या