JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठे सेकंड हँड कार मार्केट कुठे आहे?

तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठे सेकंड हँड कार मार्केट कुठे आहे?

जगातील सर्वात मोठे कार मार्केट इतके विस्तीर्ण आहे की पाच वर्षांच्या कालावधीत, 56 लाख सेकंड हँड कार येथे पोहोचल्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : ऑटोमोबाईल क्षेत्राची कार बाजारपेठ जितकी मोठी आहे, तितकी मोठी जागतिक बाजारपेठ क्वचितच कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनाला असेल. आणि या बाजाराच्या समांतर आणखी एक बाजार आहे जो बेहिशेबी आहे, मात्र, बाजार तज्ञांच्या मते तो यापेक्षा मोठा आहे. सेकंड हँड गाड्यांची ही बाजारपेठ आहे. भारतातही सेकंड हँड कारचा मोठा व्यवसाय आहे. देशातील प्रत्येक शहरात किंवा गावात सेकंड हँड कारचे डीलर आहेत, जे याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठी कार मार्केट कुठे आहे? जगातील सर्वात मोठे सेकंड हँड मार्केट पश्चिम आफ्रिकेतील बेनिन या देशात आहे. कोटोना हे समुद्रकिनारी असलेले शहर हे जगातील सर्वात मोठे कार मार्केट आहे. बेनिनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटोना शहरात जगभरातून विक्रीसाठी सेकंड हँड कार येतात. श्रीमंत देश त्यांचा कचरा म्हणून ही वाहने जहाजांमध्ये भरुन आफ्रिकेत पाठवतात. तर इथले लोक ही वाहने स्वस्तात मिळतात म्हणून खुश असतात. कोटोनाच का? आफ्रिकेतील गरिबीमुळे, श्रीमंत देशांमधून टाकून दिलेली वाहने येथे विकली जातात कारण ती खूप स्वस्त मिळतात. कोटोना हे पश्चिम किनारपट्टीचे शहर आहे, ज्यामुळे वाहनांनी भरलेले कंटेनर उतरवणे सोपे आहे. हळुहळू येथे वाहने पोहोचल्यानंतर ती संपूर्ण आफ्रिकेतील सर्वात मोठी बाजारपेठ बनली. आता देशभरातील कार डीलर्ससोबतच सामान्य खरेदीदारही कोटोना येथे पोहोचू लागले आहेत. हे कार मार्केट म्हणून जगभर प्रसिद्ध झाले आहे. कोटोना कार मेकॅनिकने भरलेले आहे जे बाहेरील देशातून येणाऱ्या वाहनांचे किरकोळ दोष दुरुस्त करतात आणि त्यांची विक्री करतात. कोटोना ही सर्वात मोठी चोरीच्या भागांची बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे कमी खर्चात खराब वाहने दुरुस्त करणे देखील शक्य आहे. वाचा - इलेक्ट्रिक Electric Vehicle: व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात गाड्या कुठून येतात कोटोना येथे विकली जाणारी सेकंड हँड वाहने सामान्य नाहीत. ही वाहने कधीकधी 20 ते 25 वर्षे जुनी असतात आणि दोन ते तीन लाख किमी चाललेली असतात. ही अशी वाहने आहेत जी आता युरोप, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये चालवता येणार नाहीत. या सर्व देशांमध्ये आता युरो 6 नॉर्म वाहने रस्त्यावर चालवता येतील. परिणामी ही वाहने त्यांच्यासाठी भंगारात जाण्यासारखीच आहेत. मात्र, आफ्रिकेत या वाहनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे ही वाहने तेथे पाठवली जातात. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, 2015 ते 2020 दरम्यान, अशी सुमारे 56 लाख सेकंड-हँड वाहने आफ्रिकेत पोहोचली. कोटोनहून गाड्या कुठे जातात? आफ्रिकेतील बेनिन, बुर्किना फासो, चाड, नायजेरिया आणि नायजर यांसारख्या देशांमध्ये कोटोनपर्यंत पोहोचणारी सेकंड हँड वाहने धावताना दिसतात. इथे अमेरिकेत 30 हजारांपर्यंत विकल्या जाणार्‍या सेडान सुमारे दोन ते अडीच हजार डॉलरमध्ये मिळतात. ज्या जेमतेम 15 ते 20 वर्षांच्या जुन्या असतात.

आफ्रिकेतील बिघडलेली परिस्थिती या सेकंड हँड गाड्यांमुळे आता आफ्रिकेतील वातावरण खराब होऊ लागले आहे. या सर्व देशांतून येणारी वाहने खूप जुनी आहेत जी प्रदूषण करतात आणि त्यांचा इंधनाचा वापरही खूप जास्त असतो. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता शाळकरी मुले आणि गरोदर महिलांवर दिसून येत आहे. ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर श्वसनाच्या इतर समस्यांनीही लोकांना त्रास देऊ लागला आहे. निर्णय घेतला पण.. पश्चिम आफ्रिकेतील या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे 2021 पासून फक्त युरो 4 दर्जाची वाहने आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण असे काहीही झाले नाही. हा नवा नियम झुगारायला एक दिवसही लागला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या