JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदीचा विचार करताय? 'या' आहेत प्रीमियम Hatchback Car, जाणून घ्या Features आणि किंमत

दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदीचा विचार करताय? 'या' आहेत प्रीमियम Hatchback Car, जाणून घ्या Features आणि किंमत

Premium Hatchback Cars: तुम्हालाही सर्वोत्कृष्ट प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी करायची असल्यास, या दिवाळीत तुम्हाला चांगली संधी आहे.

जाहिरात

(Image: Manav Sinha/News18.com)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) निर्बंधात अडकलेले जग आता या संकटातून सुटकेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्या देशातही कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आहे. त्यामुळं कोरोनाचे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. अर्थव्यवस्थाही सुधारत आहे. दिवाळीच्या (Diwali)पार्श्वभूमीवर लोक मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य अनुभवत आहेत. आतापर्यंत घर, गाडी अशा मोठ्या खरेदीच्या योजना पुढं ढकललेल्या लोकांनी आता सणासुदीच्या शुभमुहूर्तावर ही खरेदी (Shopping) करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झालं आहे. लोकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील वाहन कंपन्यांनीही नवीन वाहने दाखल केली असून, ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत सर्वोत्तम वाहन (Vehicle) खरेदी करता येणार आहे. रोख लाभांसह इतर अनेक सवलतीही दिल्या जात आहेत. त्यामुळं तुम्हालाही सर्वोत्कृष्ट प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी करायची असल्यास, या दिवाळीत तुम्हाला चांगली संधी आहे. सध्या मारुती, टोयोटा, ह्युंदाईसह अनेक कंपन्यांच्या प्रीमियम हॅचबॅक कार्सची (Premium Hatchback Cars) मॉडेल्स लोकप्रिय असून, त्यांच्या किमतीही जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे तुम्ही या गाड्यांचा विचार करू शकता. झी बिझनेस ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मारुती सुझुकी बलेनो : देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) बलेनो (Baleno) ही प्रीमियम हॅचबॅक कार आहे. 5.99 ते 9.45 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ही कार खरेदी करता येईल. यात 1.2 लिटर क्षमतेचे ड्युअल व्हीव्हिटी पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये कारचे मायलेज 21.4 किलोमीटर आहे. या कारचा लुक अत्यंत स्टायलिश असून, इंटिरियरही आकर्षक आहे. ड्युएअल एअरबॅग्जसारखी अनेक अत्याधुनिक फीचर्स असून, मारुती या कारसाठी आकर्षक दरात फायनान्स सुविधाही देत आहे. तुम्ही 8929400594 या क्रमांकावर संपर्क साधून या कारबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. वाचा :  दिवाळीत Online Shopping करताना सावधान, फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवाच ह्युंदाई आय ट्वेंटी : ह्युंदाईची आय ट्वेंटी (Hyundai i20) ही प्रीमियम हॅचबॅक कार तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे खूपच लोकप्रिय आहे. दिवाळीत प्रीमियम हॅचबॅकमध्ये हा एक चांगला पर्याय आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तिची किंमत 6 लाख 91 हजार 200 रुपयांपासून (दिल्ली एक्स-शोरूम)सुरू होते. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 10 लाख 76 हजार 800 रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर आणि 1 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत या कारवर 40 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीचा फायदा घेण्याची संधी आहे. टाटा अल्ट्रॉझ (Tata Altroz): टाटा मोटर्सची (Tata Motors) नवीन आणि अतिशय लोकप्रिय अशी प्रीमियम हॅचबॅक एक उत्तम निवड ठरू शकते. ही कार 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 5.85 ते 9.59 लाख रुपये आहे. कंपनीने अलीकडेच त्याची डार्क एडिशनही सादर केली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. वाचा :  आता पाण्याच्या इंधनावर चालणार गाड्या; पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत मोठा दिलासा टोयोटा ग्लान्झा : टोयोटाची (Toyota) प्रीमियम हॅचबॅक कार ग्लान्झाही (Glanza) एक आकर्षक पर्याय आहे. तिची किंमत 7.34 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. हिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.45 लाख रुपये आहे. 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन असलेल्या या कारमध्ये अनेक उत्तम सेफ्टी फीचर्सदेखील आहेत. फोक्सवॅगन पोलो : फोक्सवॅगन (Volkswagen) या जर्मन कार उत्पादक कंपनीची पोलो (POLO) ही भारतात अत्यंत लोकप्रिय ठरलेली प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही कार तुम्ही 6.16 लाख रुपये किमतीत खरेदी करू शकता. यात 1 लिटर क्षमतेचे एमपीआय (MPI) आणि 1 लिटर क्षमतेचे टीएसआय (TSI) इंजिनचा पर्याय आहे. या कारची रचना, वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता अत्यंत उच्च दर्जाची आहे. या दिवाळीत उत्तम प्रीमियम हॅचबॅक कार खरेदीसाठी फोक्सवॅगन पोलो हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल तर या पैकी एखादी निवडू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या