JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / हुंदाईच्या कारवर एक लाखापर्यंत कॅश डिस्काउंट; कोणाला मिळणार ऑफर?

हुंदाईच्या कारवर एक लाखापर्यंत कॅश डिस्काउंट; कोणाला मिळणार ऑफर?

कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑटोमोबाइल कंपनी हुंदाई इंडियानं त्यांच्या काही कारवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे.

जाहिरात

ह्युंदाई कार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑटोमोबाइल कंपनी हुंदाई इंडियानं त्यांच्या काही कारवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे कंपनीकडून कारच्या विविध मॉडेलवर कार्पोरेट, एक्स्चेंज आणि कॅश डिस्काउंट दिलं जात आहे. कारच्या कुठल्या मॉडेलवर किती सूट मिळत आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. Kona Electric भारतीय बाजारात हुंदाईनं Kona Electric ही पहिली इलेक्ट्रिक कार 2019 मध्ये लाँच केली आहे. या ऑफरमध्ये कारवर 1 लाख रुपयांपर्यंत रोख सवलत दिली गेली आहे. कुठलाही नागरिक या सवलतीचा लाभ घेऊ शकतो. पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ईव्हीची रेंज 452 किलोमीटरपर्यंत आहे. लाँचिंगनंतर कारबद्दल लोकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. या कारला लोकांकडून पसंतीही मिळालेली आहे. हेही वाचा  -  Android Phones : अँड्रॉइड डिव्हाइसवरचे डिलीट केलेले मेसेज परत मिळवता येतात का? Grand i10 Nios ऑटोमोबाइल कंपनीच्या ग्रँड आय10 निओस या 1.0 लिटरच्या टर्बो व्हेरियंटवर 35,000 रुपये सवलत दिली जात आहे. तर सीएनजी व्हेरियंटवर 25,000 रुपये आणि 1.2 लिटर पेट्रोल व्हेरियंटवर 15,000 रुपयांची रोख सवलत दिली जात आहे. कंपनी या कारवर 10,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंटही देत आहे. ग्राहकांना या कारवर सर्वाधिक 48 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. जवळील शोरूमला जाऊन या कारची वैशिष्ट्येही समजून घेता येतील. Hyundai Aura कंपनी त्यांच्या पेट्रोल आणि सीएनजी कारच्या ऑरा मॉडेलवर 5,000 रुपये आणि 25,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट देत आहे. याशिवाय या विविध मॉडलवर ग्राहक 10,000 रुपये एक्स्चेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कार्पोरेट सवलतही प्राप्त करू शकतात. Hyundai i20 ग्राहकांना या कारवर 10,000 रुपयांची रोख सूट देण्यात येत आहे. एक्स्चेंज बोनसच्या रुपात आणखी डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. मॅग्ना आणि स्पोर्ट्स मॉडेलमध्ये ही सवलत दिली जात आहे. दरम्यान, हुंदाई कंपनीच्या विविध कारची मॉडेल्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. हुंदाईची कार घेण्यासाठीही ग्राहकांमध्ये नेहमी चढाओढ असते. यंदा दिवाळी, दसरा या सणांमध्ये बाजारात ऑटोमोबाइल क्षेत्रात बरीच वृद्धी झाल्याची बाब नोंदवली गेली आहे. हुंदाई कंपनीच्या विविध कारची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. एरव्ही सणासुदीत ऑफर दिली जात असताना आता दिवाळीनंतरही कंपनीनं कारवर सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत कारवरील रोख स्वरूपाची सवलत असणार आहे. त्यामुळे कार घेण्याचे नियोजन असेल तर याचा लाभ घ्यायला हवा, असं आवाहन कंपनीच्या वतीनं केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या