JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / मैत्रीत दगा! मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्...

मैत्रीत दगा! मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्...

Crime in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला (Friendship) कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या मित्राच्या बहिणीवरचं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 17 जुलै: औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला (Friendship) कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या मित्राच्या बहिणीवरचं अतिप्रसंग (Attempt to rape on friend’s sister) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीनं आरडाओरडा केल्यानं आरोपीचं काळंबेर बाहेर आलं आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच वसमत पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. विश्वनाथ आंबादास लासिनकर असं अटक झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. वसमत शहरातील सोमवार पेठेत राहणाऱ्या एका तरुणासोबत त्याची चांगली मैत्री होती. पण मागील काही दिवसांपासून त्याचा आपल्या मित्राच्या बहिणीवर डोळा होता. मित्राच्या बहिणीला लग्नाचं आमिषही त्यानं दाखवलं होतं. दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी विश्वनाथ मित्राच्या घरी आला. हेही वाचा- माहेरी जाऊन पत्नीनं बांधली दुसऱ्याच सोबत लग्नगाठ; पहिल्या पतीनं केली अजब मागणी यावेळी त्यानं मित्राच्या विधवा बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण पीडित तरुणीनं आरडाओरडा केल्यानं घरातील इतर कुटुंब मदतीसाठी धावून आले. यावेळी आरोपी विश्वनाथ अतिप्रसंग करताना रंगेहाथ पकडला गेला. पीडित तरुणीनं आरडाओरडा केल्याच्या रागातून आरोपीनं घरातील टेबल, खुर्च्या, कपाट व इतर साहित्याची तोडफोड केली. आणि तेथून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीनं आपल्या कुटुंबीयांसोबत वसमत पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली. पीडित तरुणीच्या पतीचं अलीकडेच निधन झालं होतं. त्यामुळे ती आपल्या भावाच्या घरी राहत होती. हेही वाचा- खानावळीसाठी घरी येत विवाहितेसोबत जुळवलं सूत; अनैतिक संबंधातून चिमुरड्याचा खून पीडितेच्या तक्रारीनंतर वसमत पोलिसांनी आरोपीविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली आणि अवघ्या काही तासांतच आरोपी विश्वनाथ लासिनकरच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास वसमत पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या