JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / या 2 जन्मांकाच्या लोकांनी एकत्र निर्णय घेणं किंवा त्यांचं एकमत होणंही महामुश्कील!

या 2 जन्मांकाच्या लोकांनी एकत्र निर्णय घेणं किंवा त्यांचं एकमत होणंही महामुश्कील!

क्रमांक 4 हा क्रमांक 1 आणि 2 शी किती सुसंगत आहे. क्रमांक 4 चा स्वामी ग्रह राहू (युरेनस) आहे.

जाहिरात

अंकशास्त्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

क्रमांक 1 : क्रमांक 4 चा स्वामी राहू हा उग्र ग्रह आहे तर क्रमांक 1 चा संबंध सूर्य अर्थात रविशी दूरच्या नातेवाईकासारखा असतो त्यामुळे संवाद खूप कमी असतो. या दोघांमध्ये स्वतंत्र वृ्त्ती आणि अहंकारीपणा असतो, त्यामुळे बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतो. क्रमांक 1 आणि क्रमांक 4, अशा दोघांनाही एकत्र निर्णय घेणं किंवा त्यांचं एकमत होणं अवघड असतं. त्यामुळे व्यावसायिक भागीदारांनी कागदोपत्री भागीदार होणं टाळावं. विवाहित जोडप्यांना एकमेकांचे सहकार्य आणि पाठबळ मिळाले तरच ते त्या आधारे असे आव्हानात्मक जीवन जगू शकतात. या क्रमांकाच्या व्यक्तींनी मालमत्ता आणि धातूशी संबंधित व्यवसाय केला तर त्यांना फायदा होतो. त्यामुळे त्यांनी अशा व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे. या क्रमांकाच्या राजकीय व्यक्तींनी नियमाला अनुसरून गोष्टी केल्यास त्यांना राजकीय करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकते. शुभ रंग - पिवळा आणि राखाडी, दान - या व्यक्तींना एखाद्या आश्रमात तेल दान करावं.

क्रमांक 2 : क्रमांक 2 आणि क्रमांक 4 असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण राहणं कठीण आहे. क्रमांक 4 च्या व्यक्ती व्यावहारिक जीवनावर विश्वास ठेवणाऱ्या आणि शिस्तबद्ध असतात तर क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील असतात. क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती मनाने विचार करतात तर क्रमांक 4 असलेल्या व्यक्ती नेहमी बुद्धीने विचार करून कार्यरत असतात. हे वाचा -  या 5 प्रभावी मंत्रांचा जप करून पडा घराबाहेर, अवघड कामंही लिलया पार पाडू शकाल त्यामुळे या दोघांमध्ये भावनिक दरी दिसून येते. परिणामी त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक नातेसंबंधांत अस्वस्थता दिसून येते. मात्र, या अंकांची जोडपी त्यांचा ईक्यू प्रयत्नपूर्वक संतुलित ठेवतात आणि त्यामुळे ते वैवाहिक जीवनात आनंदी राहतात. या दोघांनीही भगवान शंकराची पूजा करून एखाद्या अनाथाश्रमात दूध दान करावं. या व्यक्तींना औषधी, दूध, द्रव, शिक्षण, दागिने,पाण्याशी संबंधित उद्योगांमध्ये चांगले यश मिळते. शुभ रंग - पांढरा, दान - या व्यक्तींनी आश्रमात पांढरे तांदूळ दान करावेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या