अहमदनगर, 21 ऑक्टोबर: शिर्डी साईबाबा संस्थान (Shirdi Sai Baba Sansthan) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. संस्थानच्या एका जनसंपर्क विभागातल्या अधिकाऱ्यानं काही महिला भक्तांना (female devotees) मोबाईलवरुन अश्लील मेसेज (obscene messages) पाठवले आहेत. या प्रकरणी आता तक्रार करण्यात आली आहे. महिलांनी आसाम आणि मुंबईतल्या संस्थानकडे ही तक्रार केल्याचं समजतंय. या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बानायत यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. हेही वाचा- Porn बघायला नकार दिल्यानं 6 वर्षाच्या मुलीची हत्या, तीन अल्पवयीन मुलांना अटक या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकार्यानं मुंबई आणि आसाममध्ये असलेल्या साईभक्त महिलांशी सुरुवातीला काही कारणांतून जवळीक साधली. त्यानंतर त्या महिला साईभक्तांना मोबाईलवरुन अश्लील व्हिडिओ पाठवलेत. संबंधित या महिलांनी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे तक्रार केली आहे. हेही वाचा- एकाही मृत्यूची नोंद नाही, महापौरांच्या प्रतिक्रियेनं उंचावेल पुणेकरांची मान पुढे निवेदनात म्हटलं की, संबंधित महिलांच्या लेखी तक्रारीची दखल घेण्यात यावी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं साईबाबा संस्थान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी असे विचित्र प्रकार घडू नयेत. आपण एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशा महिला अधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून महिला भक्तांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.