JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / नगरमध्ये ATM क्लोन करून लाखोंचा गंडा; 8वी पास बहाद्दर निघाला मास्टरमांइड

नगरमध्ये ATM क्लोन करून लाखोंचा गंडा; 8वी पास बहाद्दर निघाला मास्टरमांइड

Crime in Ahmednagar: पेट्रोल पंपावर स्किमर मशीनद्वारे एटीएम क्लोन (Money fraud by ATM Clone) करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 16 सप्टेंबर: पेट्रोल पंपावर स्किमर मशीनद्वारे एटीएम क्लोन (Money fraud by ATM Clone) करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोघांसह त्यांच्या मास्टरमाइंडला अटक केली (3 arrest) आहे. संबंधित आरोपी पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या नागरिकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करत होते. तीन महिन्यांपूर्वी एका ग्राहकाचं एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. सुजित राजेंद्र सिंग असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी आहे. आरोपी सिंग हा केवळ आठवी पास आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी एका नायजेरिन टोळीच्या संपर्कात आला होता. आरोपीनं त्यांच्याकडून एटीएम क्लोन करण्याचं तंत्र शिकून घेतलं होतं. त्यानंतर त्यानं स्वत:ची टोळी तयार करून अनेकांना गंडा घातला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक लॅपटॉप, पाच मोबाइल, एक कॉम्प्युटर, सात पेन ड्राइव्ह, चार स्किमर मशीन एक कलर प्रिंटर, 54 बनावट एटीएम कार्ड आणि अनेक सीमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. हेही वाचा- विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं नेमकी घटना काय आहे? अन्य दोन आरोपी धीरज अनिल मिश्रा आणि सूरज अनिल मिश्रा हे नगर जिल्ह्यातील अरणगाव येथील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यांनी पेट्रोल पंपावर एटीएम कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकाचं नकळतपणे एटीएम क्लोन करण्याचा सपाटा लावला होता. त्यांनी मागील तीन महिन्यांत अनेक नागरिकांचे एटीएम क्लोन केले आहेत. दरम्यान एका नागरिकाची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत धीरज अनिल मिश्रा आणि सूरज अनिल मिश्रा या दोघा भावंडाना अटक केली होती. हेही वाचा- ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार…’, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक यानंतर आरोपी सूरज यानं पोलीस चौकशीत आरोपी सुजित सिंग यांच्या सांगण्यावरून आपण एटीएम कार्ड क्लोन करत असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता मुख्य आरोपी सुजित सिंग हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं यापूर्वी आणखी किती जणांना आर्थिक गंडा घातला आहे. याची चौकशी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या