JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / नगरमधील मुलीनं पंधराव्या वर्षीच दिला बाळाला जन्म; पोलिसांनी पालकांविरुद्ध घेतली अ‍ॅक्शन

नगरमधील मुलीनं पंधराव्या वर्षीच दिला बाळाला जन्म; पोलिसांनी पालकांविरुद्ध घेतली अ‍ॅक्शन

Crime in Ahmednagar: नगरमध्ये एका 15 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिसांनी पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 01 ऑगस्ट: अल्पवयीन मुलीचं किंवा मुलाचं लग्न (Child Marriage) लावून देणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तरीही देशातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावून दिले जातात. यामुळे मुलींना कमी वयातचं मातृत्व स्विकारावं लागतं. परिणामी भविष्यात विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. पुरोगामी म्हणवून घेण्याऱ्या महाराष्ट्रात एक बालविवाहाची संतापजनक घटना समोर आली आहे. आई वडिलांनी चौदाव्या वर्षी मुलीचं लग्न लावून दिल्यानं संबंधित मुलगी 15 व्या वर्षीच आई झाली आहे. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येताच मुलीचे आई -वडील आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचं किमान लग्नाच वय 18 वर्षे आणि मुलाचं 21 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. असं असूनही ग्रामीण भागात सर्हासपणे या कायद्याचं उल्लंघन केलं जातं. या प्रकरणी अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… 15 वर्षीय पीडित मुलगी नगर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. मुलीच्या आई वडिलांनी मे 2020 मध्ये तिचं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा ती केवळ चौदा वर्षांची होती. लग्नानंतर काही महिन्यातचं तिला गर्भधारणा झाली होती. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचं तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. ही बाब डॉक्टरांनी पोलिसांच्या कानावर घातली. हेही वाचा- वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार तसेच चाइल्ड लाइननं या घटनेची पुष्टी केली आहे. यानंतर अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी संबंधित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित मुलीनं पुण्यातील ससून रुग्णालयात 15 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे आई -वडील आणि सासू सासऱ्यांविरोधात बाल विवाह लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या