JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / उसाच्या फडात पोलिसांनी छापा टाकला अन् 50 लाखांचा माल पाहून हैराण झाले, नगरमधील घटना

उसाच्या फडात पोलिसांनी छापा टाकला अन् 50 लाखांचा माल पाहून हैराण झाले, नगरमधील घटना

पोलीस जेव्हा पांढरी पुल शेवगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकर वाडी शिवारात पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातील काही आढळून आले नाही. पण,

जाहिरात

पोलीस जेव्हा पांढरी पुल शेवगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकर वाडी शिवारात पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातील काही आढळून आले नाही. पण,

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 29 ऑगस्ट : आम्हाला शेतात गांजाचे पिक घेऊ द्या, अशी मागणी एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एका सदन शेतकऱ्याने ऊसाच्या फडात तब्बल 50 लाख किंमतीचा 500 किलो गांजा (Hemp seized)  लपवून ठेवल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला असलेल्या शंकरवाडी गावाच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला आहे.  गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी धाड टाकून ही धडाकेबाज कारवाई केली. Job Alert: संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर इथे प्रोफेसर पदासाठी होणार भरती पोलीस जेव्हा  पांढरी पुल शेवगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकर वाडी शिवारात पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातील काही आढळून आले नाही. पण, नंतर जेव्हा ऊसाच्या फडात जाऊन पाहणी केली असता पोलिसांना एकच धक्का बसला. ऊसाच्या फडात पोतीच्या पोती गांजाने भरून ठेवलेली होती. उसाच्या शेतात गांजाची पॅकिंग करून ठेवलेली शेकडो पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहे. साधारण 500 किलो हा गांजा असल्याने त्याची किंमत 50 लाख इतकी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच या ठिकाणाहून पाच क्विंटल गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली सूर्या-पृथ्वी नाही, तर हा मुंबईकर घेणार रहाणेची जागा, विराटला म्हणाला ‘मी तयार’ शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे व पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने संयुक्तिक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे पाच क्विंटल गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी  पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या