JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्...

बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्...

श्वानाच्या तोंडात सापाला पाहून घाबरलेल्या मालकिणीने स्वतःच त्याच्या तोंडात हात टाकून सापाला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिडनी, 28 मे : बऱ्याच सापांना तुम्ही दंश करताना, आपल्या शिकारीला गिळताना, विळखा घालताना पाहिलं असेल. पण एक साप चक्क एका श्वानाच्याच तोंडात घुसला (Snake in dog’s mouth). धक्कादायक म्हणजे हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप होता. आपल्या श्वानाला सापापासून वाचवण्यासाठी मालकिणीने त्याच्या तोंडात हात टाकला पण तिच्यावरही सापाने हल्ला केला (Snake attack on woman). साप साप असतो. मग त्याला टीव्हीवर पाहा किंवा प्रत्यक्ष समोर. सापाला पाहून घाम फुटतोय ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहणारी महिलाही आपल्या श्वानाच्या तोंडात सापाला पाहून घाबरली. श्वानाच्या तोंडात साप पाहून तिला धडकीच भरली. पण साप छोटासा होत, त्यमुळे तिला तो साधा वाटला. म्हणून भीती वाटली तरी तिने तो हातानेच श्वानाच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला (Woman pulled out deadly snake from dog’s mouth). त्यावेळी सापाने तिच्या हाताला दंश केला. हे वाचा -  कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO साप पकडणारे तज्ज्ञ स्टुअर्ट मॅकेंजीला तिने फोन करून तात्काळ बोलवलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, स्टुअर्ट सापाला पाहून हैराण झाला. कारण तो साधासुधा साप नव्हता. जगातील दुसरा सर्वात विषारी साप होता. ज्याचं नाव इस्टर्न ब्राऊन स्नेक  (Eastern Brown Snake) आहे. याचं विष इतकं घातक असतं की माणसाचा मृत्यू होऊ शकतो. हे साप बऱ्यादा विष काढल्याशिवायच दंश करतात. सापाला पाहताच स्टुअर्टने महिलाला लगेच आपल्या हातावर बँडेज बांधायला सांगितलं आणि अॅम्बुलन्स बोलावून ते रुग्णालयात पोहोचले. श्वान आणि मालकिण दोघंही सापाच्या हल्ल्यापासून वाचले पण अशा विषारी सापांच्या पिल्लांपासूनही सतर्क राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.  ज्या सापाबाबत तुम्हाला माहिती नाही, असा सापाला हात लावू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या