JOIN US
मराठी बातम्या / Viral / मेक्सिकोतील लिलावात तब्बल 63 लाखांना विकली गेली जीन्सची जोडी? काय आहे यामागचे कारण…

मेक्सिकोतील लिलावात तब्बल 63 लाखांना विकली गेली जीन्सची जोडी? काय आहे यामागचे कारण…

कधी एखादी जीन्स ही लाखो रुपयांना विकली गेल्याचं ऐकलंय? नाही ना. पण असं खरंच घडलंय. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर :  मार्केटमध्ये विविध फॅशनचे कपडे मिळतात. फिल्मसच्या नायक-नायिकांच्या फॅशनचाही लोकांवर परिणाम होताना दिसतो. केवळ तरुणाईलाच नाही तर सर्व वयोगटांतील व्यक्तींना फॅशनची भुरळ ही पडतेच. फॅशन सारखी बदलत राहते तरीही अनेक वर्ष टिकून आहे ती म्हणजे जीन्स पँट वापरण्याची फॅशन. कंपनीनुसार जीन्सच्या किंमतीत फरक पडतो. पण कधी एखादी जीन्स ही लाखो रुपयांना विकली गेल्याचं ऐकलंय? नाही ना. पण असं खरंच घडलंय. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. काहीतरी विचित्र, अनाकलनीय गोष्ट ऐकली, पाहिली तर आपण चाटच पडतो. सध्या एका जीन्सच्या लिलावाची चर्चा चांगलीच रंगलीय. याचं कारण म्हणजे जीन्सची जोडी एक नाही, दोन नाही तर तब्बल 63 लाखांना विकली गेलीय. 1 ऑक्टोबरला न्यू मेक्सिकोमध्ये काही गोष्टींचा लिलाव झाला. त्यात 1880 सालातली जीन्सची जोडी लिलावात विक्रीला होती. ही जीन्सची जोडी लिवाईस(Levi’s) कंपनीची आहे. ही जोडी विकत घेणाऱ्या ग्राहकाने यासाठी 76,000 डॉलर मोजलेत. अर्थात, भारतीय चलनाप्रमाणे 63 लाख रुपये मोजले आहेत. जीन्स विकत घेतल्यावर पोस्ट करून दिली माहिती हेही वाचा - पाहताक्षणी वाटेल सापाची जोडी, नागमोडी वळणाच्या रेल्वे ट्रॅकचे पाहा काय आहे सत्य! ही जीन्स खरेदी करणाऱ्या काईल हॉपर्टने वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलाताना आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी अजूनही काहीसा गोंधळलोय.’ ही जीन्स विकत आपण विकत घेतल्याबद्दल ते स्वत: अचंबित आहेत. लिलावातील बोलीनंतर ज्यावेळेस किंमत निश्चित झाली, त्यावेळेस बायर्स प्रीमिअमचे पैसे धरून एकूण 87400 डॉलर त्यांनी भरले. ही महागातली जीन्स विमान, ट्रॅफिक लाईट आणि रेडिओचा शोध लागण्यापूर्वीची आहे. हॉपर्ट हे विंटेज कपड्यांचे डिलर आहेत. त्यांनी आपल्या स्टोअरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लिलावच्या वेळेचे आणि जीन्सचे फोटो शेअर केलेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘76,000 डॉलरची जीन्स, ती सुद्धा 1880 सालातील’ त्यांनी पुढे म्हटलंय, ‘लिवाईसच्या माहीत असलेल्या सगळ्यात जुन्या जीन्सच्या जोड्यांपैकी ही एक आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे; ज्यांनी मला नेहमीच सपोर्ट केलाय. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मी इतक्या जुन्या जीन्सचा आता मालक आहे.’ 23 वर्षांच्या तरुणाने बोली लावून विकत घेतली ही जीन्स वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, ही जीन्स विकत घेणार्‍या व्यक्तीचं नाव काईल हॉपर्ट आहे. 23 वर्षांचा काईल हा सॅन डिएगो, कॅलिफोर्नियामध्ये राहतो. काईल हा विंटेज कपडे विकणारा डिलर आहे. आतापर्यंत कुणीच विंटेज जीन्स विकत घेण्यासाठी इतके पैसे मोजलेले नाहीत. ही एकमेव विंटेज जीन्स आहे जी 63 लाखाला विकली गेलीय. ही जीन्सची जोडी अमेरिकेतील एका निर्जन खाणीतून मिळाली. 1880 च्या दशकात ही जमिनीखाली गाडली गेली असावी असा अंदाज आहे. गोल्डन स्टेटव्हिटीजीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या जीन्सचे फोटो शेअर केले आहेत. जगात अनेक गोष्टी घडत असतात. सोशल मीडियामुळे त्या लगेच व्हायरलही होतात. अशाचप्रकारे हा लिलावाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण 63 लाखांची जीन्स विकत घेणाऱ्या काईल हॉपर्टला जगावेगळा माणूसचं म्हणायाला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या