02 ऑगस्ट : माणसांचे पाळीव प्राण्यांबरोबरच्या मस्तीचे व्हिडीओ बऱ्याचदा इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण एखाद्या शार्कला त्याच्या शेपटीला पकडण्याची हिम्मत शक्यतो कुणी करणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी शार्कच्या (Shark) शेपटीला पकडून त्याला समुद्रात जाण्यासाठी मदत करत आहे. पाण्याच्या लाटेबरोबर त्याला समुद्रात जाण्यासाठी ती मदत करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा (IFS Susanta Nanda) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटरवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, ‘सर्व शार्क खतरनाक नसतात. एका मुलीने शार्कला वाचवण्यासाठी असे काहीतरी केले. महासागरांमध्ये असणाऱ्या शार्कच्या एकूण 500 प्रजातींपैकी केवळ 30 असे आहेत की जे माणसांवर हल्ला करतात.’ (हे वाचा- 2 तास काहीच न केल्याचा VIDEO केला पोस्ट; तरीही युट्यूबवर 19 लाख VIEWS )
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 8 हजारांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ ट्विटरवर पाहण्यात आला आहे. तर रिट्विट आणि लाइक्सची संख्याही वाढणारी आहे. या व्हिडीओमधील मुलीला ट्विटर युजर्सनी ‘खरी हिरो’ म्हणून संबोधले आहे. तिचे कौतुकच खूप जणांनी कमेंटमध्ये केले आहे. दरम्यान शार्कला इतक्या सहज हात लावला म्हणून काहींनी आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.