प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
लंडन, 08 नोव्हेंबर : रात्री काहीतरी अचानक काहीतरी हलताना दिसणं, बेडवर काहीतरी हालचाल होणं… रात्रीच्या वेळी अशा विचित्र घटना घडल्यानंतर साहजिकच कुणालाही भीती वाटेल. आता फक्त वाचूनही तुमच्या मनात किती तरी विचार येऊन, तुमच्याही काळजात धस्सं झालं असेल. पण एका महिलेसोबत हे प्रत्यक्षात घडलं. त्यामागील जेव्हा सत्य कारण तिला समजलं तेव्हा धक्काच बसला. यूकेतील एक महिला आपला बॉयफ्रेंड आणि आपल्या श्वानासोबत एका रूममध्ये झोपली होती. त्यानंतर तिथं असं काही घडलं की तिच्यासह तिच्या बॉयफ्रेंडलाही दरदरून घाम फुटला. ते दोघंही ओरडत, किंचाळत उठले आणि लगेच बेडवरून बाजूला झाले. नॉर्थेंट्सच्या वेलिंगबरोमध्ये राहणारी 23 वर्षांची ताशा लेन आपला 25 वर्षांचा बॉयफ्रेंड रेकी पेरिलोन आणि आपल्या पाळीव श्वानासोबत बेडवर झोपली होती. पहाटे 4 च्या सुमारास तिला अचानक जाग आली. तेव्हा तिला बेडवर काहीतरी हलत असल्याचं दिसलं. सुरुवातीला तिला तिचा कुत्रा त्रास देत असल्यासारखं वाटलं. पण नंतर ती उठली आणि तिने टॉर्च पेटवून चादरीच्या आत पाहिलं. तेव्हा तिला जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. हे वाचा - या मंदिरातील गुफेत राहतो ‘अजगर बाबा’; अॅनाकोंडापेक्षा मोठा असल्याचा लोकांचा दावा तिला दोन डोळे चमकताना दिसले. त्यानंतर तिला दरदरून घाम फुटला. तिच्या अंगावर काटा आला. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. बेडवरून पटकन उठली आणि लाइट लावून तिने सर्वांना जागं केलं. तिचा आवाज ऐकून तिचा बॉयफ्रेंडही घाबरून उठला. त्यानेही बेडवरील ते दृश्य पाहिलं तेव्हा त्याचीही हवा टाइट झाली. तोसुद्धा किंचाळू लागला. त्या दोघांचा आवाज ऐकून रेकीची आई त्यांच्या रूममध्ये धावत आली. तिला समोर जे दिसलं ते पाहून ती शॉक झाली. तो दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क साप होता. नारिंगी रंगाचा साप. साप चादरीच्या आताच होता. हे वाचा - अंधारात अचानक समोर आला बिबट्या, भीतीने नागरिकांनी त्याच्यावर टॉर्च मारताच…; VIDEO VIRAL रेकी म्हणाला, तो सापाला घाबरत नव्हता पण अशा स्थितीत साप दिसणं खूप भयानक होतं. ताशाच्या बॉयफ्रेंडच्या आईने सांगितलं की हा साप त्यांच्या शेजाऱ्यांचा पाळीव साप आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो गायब होता. रेकीच्या आईने त्या सापाला तिथून हटवलं. तो एक कॉर्न स्नेक होता. हे साप विषारी नसतात. त्यामुळे लोक पाळतात. यांना सर्वात फ्रेंडली स्नेक मानलं जातं.