प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
वॉशिंग्टन, 12 जानेवारी : मासिक पाळी महिलांना दर महिन्याला येते. सामान्यपणे जास्तीत जास्त 7 दिवस महिलांना पीरियड्सच्या त्रासातून जावं लागतं. या कालावधीत वेदनेसह इतरही बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यावेळी पाळी नकोशी वाटते. पण एका महिलेने अशाच मासिक पाळीचा आठवडाभर नव्हे तर जवळपास 3 महिने सामना केला. या महिलेला सलग 83 दिवस पीरिअड्स होते. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी रॉनी माय. जिला सलग 83 दिवस पीरिअड्स आले. तिने मासिक पाळीचा आपला हा भयावह अनुभव सांगितला आहे. रॉनी म्हणाली, जेव्हा ती आपल्या बाथरूमपासून डेस्कवर गेली तेव्हा तिच्या पायावर रक्त वाहू लागलं. त्यानंतर ऑफिसमधून ती घरी आली आणि एका तासातच टॅम्पॉनचा पूर्ण बॉक्स आणि पॅडचं पूर्ण पाकिट तिने वापरलं. वेदना कमी करण्यासाठी ती हिटींग पॅड वापरत होती. रक्तस्राव थांबवण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. अखेर तिने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हे वाचा - बापरे बाप! तरुणीचं चक्क अजगरासोबत डेटिंग; हॉटेलमध्ये गेले आणि… Shocking Video Viral ती डॉक्टरांकडे गेली आणि तिने त्यांना आपल्या या परिस्थितीबाबत सांगितलं तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. तुम्हाला खरंच इतकं ब्लीडिंग झालं का, असं डॉक्टरांनी आपल्याला एमर्जन्सी रूममध्ये विचारल्याचं रॉनीने सांगितलं. तिला किती तरी वेळा पॅनिक अटॅकही आला. हार्ट रेट आणि बीपी वाढला. तिला रक्त चढवावं लागलं. सर्जिकल प्रोझिरही करावी लागली. डेली मेलच्या रिपोर्टनुसार रॉनीने सांगितलं, तिला कित्येक वर्षे वेळेत पीरियड्स येत नव्हतं. त्यानंतर 2015 साली तला पीसीओएस असल्याचं निदान झालं. तिला नेहमी पीरिअड्समध्ये भरपूर रक्तस्राव व्हाययचं. पण 2018 मध्ये एक दिवस ती डेस्कवरून उठली आणि पूर्ण रक्ताने माखली. हे वाचा - ‘मी खूप सुंदर आहे माझ्या सारख्या मुलांना जन्म द्या’; मॉडेलची अजब ऑफर ऐकून बसेल धक्का पीसीओएस हार्मोन अनियंत्रित असल्याने गर्भाशयाचं आवरण वाढतं, ज्यामुळे हेव्ही पीरिअड्स होतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं तिला आराम मिळाला. दोन आठवडे ती रुग्णालयात होती.