नवी दिल्ली, 30 जानेवारी : प्रेम ही खरं तर सहज सुलभ भावना असते. एखाद्या व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडेल आणि भावनेच्या भरात कोणतं कृत्य करेल हे कोणीच सांगू शकत नाही. सोशल मीडियावर प्रेम प्रकरणं, विवाहसोहळ्यांशी निगडीत अनेक मजेशीर घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओजमधून मनोरंजन होत असते. पण काही घटना या आश्चर्याचा धक्का देणाऱ्या असतात. सध्या अशीच एक मजेरशीर पण काहीशी धक्कादायक घटना चर्चेत आहे. एका महिलेनं चक्क तिच्या आवडत्या ब्लँकेटशी लग्न केलं आहे. पहिल्या नजरेत मी माझ्या ब्लँकेटच्या प्रेमात पडले. माझा ब्लँकेटशी लग्न करण्याचा निर्णय माझ्या बॉयफ्रेंडला माहिती आहे. या गोष्टीचा माझ्या बॉयफ्रेंडला हेवा वाटत नाही तर अभिमान वाटतो,`` असं ही महिला म्हणते. या महिलेचा हा अजब निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच सोशल मीडियावर या विवाहाचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. माणूस माणसाशी लग्न करतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीने निर्जीव वस्तूशी विवाह केला तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण एका महिलेनं असं केलं आहे. पास्कल सेलिक नावाच्या महिलेनं चक्क तिच्या ब्लँकेटशी विवाह केला आहे. ``हे माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचं सर्वांत अर्थपूर्ण नातं आहे. मी पहिल्या नजरेतच त्याच्या प्रेमात पडले,`` असं पास्कल सांगते. या अनोख्या बॉयफ्रेंडसोबत विवाह केल्याचा आणि या अजब नात्याचा खुलासा पास्कलने नुकताच केला आहे. विशेष म्हणजे पास्कलने तिच्या बॉयफ्रेंडच्या उपस्थितीत ब्लँकेटशी विवाह केला आहे.
पास्कलने 2019 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं ओपन वेडिंग सेरेमनीचं आयोजन केलं होतं. `डेली स्टार`च्या वृत्तानुसार, पास्कलने इंग्लंडमधील एक्सेटर शहरात तिच्या ब्लँकेटशी विवाह केला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी तिने कुटुंबियांसह बॉयफ्रेंडला आमंत्रित केलं होतं. एका टीव्ही शोमध्ये बोलताना पास्कलने सांगितलं, ``माझ्याकडे अनेक ब्लँकेट आहेत. पण हे ब्लँकेट सर्वात विश्वासू आहे. कारण यामुळे उबदार वाटतं आणि आराम मिळतो. मी स्वतःच्या प्रेमाला महत्त्व देण्यासाठी हा विवाह केला आहे. प्रेम मिळवण्यासाठी नातं आवश्यक असतं हे लोकांना समजावं यासाठी मी हा निर्णय घेतला.` मामला प्यार का है! गुपचूप लग्न करत होता बॉयफ्रेंड, तरुणीने मंडप गाठून शिकवली अद्दल ब्लँकेटशी माझं नातं एखाद्या मित्राप्रमाणे आहे. सुख-दुःखात तो माझ्या सोबत असतो, असं पास्कलने सांगितलं. जेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं सांगितलं, ``ब्लँकेटशी विवाह करण्याचा उद्देश समजून घ्यावा. माझा बॉयफ्रेंड जॉनीला आमच्यातील हे नातं समजतं. एक संदेश देण्यासाठी मी ब्लँकेटशी विवाह केला आहे. आमच्यात खरोखर प्रेमळ नातं आहे. त्याला माझ्या ब्लँकेटचा हेवा वाटत नाही तर अभिमान वाटतो, असं पास्कलने सांगितले. पास्कलच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचे फोटोदेखील शेअर केले जात आहेत.