JOIN US
मराठी बातम्या / Viral / या एका छोट्याशा किड्यामुळे महिलेची 13 वर्ष मृत्यूशी झुंज; तुमच्याही आसपास असेल तर सावधान!

या एका छोट्याशा किड्यामुळे महिलेची 13 वर्ष मृत्यूशी झुंज; तुमच्याही आसपास असेल तर सावधान!

मच्छरासारखा छोटासा किडा माणसाचं आयुष्य वेदनेने भरून टाकू शकतो, याची कल्पना कोणीही करू शकत नाही, पण हे एका महिलेसोबत घडलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 डिसेंबर : अनेक वेळा आपण डास आणि इतर लहान कीटकांमुळे खूप अस्वस्थ होतो. बर्‍याच वेळा एखाद्या लहान कीटकाचा चावा देखील निरोगी व्यक्तीला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकतो. डास आपल्याला माहीत आहेत, पण काही कीटक असे आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते, तरीही त्यांच्या एका चाव्यामुळे माणसाचं जीवनच वेदनादायी जाऊन जातं. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. बेडकाने तोंडात पकडलं अन् मांजराने केला हल्ला, तरी सापाने घेतली नाही माघार, शेवटी..लढाईचा Live Video मच्छरासारखा छोटासा किडा माणसाचं आयुष्य वेदनेने भरून टाकू शकतो, याची कल्पना कोणीही करू शकत नाही, पण हे एका महिलेसोबत घडलं आहे. या महिलेची कहाणी तुम्हाला थक्क करून सोडेल. जोर्जा ऑस्टिन नावाच्या महिलेनं आपली ही वेदनादायी कहाणी लोकांना सांगितली, जेणेकरून भविष्यात कीटकाच्या चावण्याकडे कोणीही दुर्लक्ष न करता ही बाब गांभीर्याने घ्यावी. 2009 मध्ये जोर्जा ऑस्टिन तिच्या बागेची कापणी करत होती. त्याचवेळी तिला एका साध्या दिसणार्‍या किड्याने चावा घेतला. कीटक चावल्यानंतर तिच्या पायाला सूज आणि लालसरपणा दिसून आला. महिलेच्या एका पायाला चार पिनहोलसारखे चावे दिसत होते, जे बरे होण्यास बराच वेळ लागत होता. आधी तिला वाटलं की आयरनच्या कमतरतेमुळे असं होत आहे, परंतु नंतर कळलं की ही बाब गंभीर आहे. नाताळची तयारी सुरू असताना ख्रिसमस ट्रीवर आढळला जहाल विषारी साप; पाहताच कुटुंबाची उडाली घाबरगुंडी तिला पायोडर्मा गँग्रेनोसम नावाची दुर्मिळ कंडीशन झाली होती, जो एक वेदनादायक त्वचा रोग आहे. तिच्या पायातून पू येत होता आणि तिची तब्येत बिघडत होती. मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेची प्रकृती बिघडत असल्याने तिला या वर्षाच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तिला वाटलं की आता दोन्ही पाय कापावे लागतील, मग एक चमत्कार घडला आणि ती बरी होऊ लागली. 13 वर्षांनंतर तिला पुन्हा ख्रिसमस साजरा करता आला. जोर्जाची ही अवस्था झाली ती नॅट नावाच्या किटकामुळे. भारतात या किड्याला कुटकी किंवा भुंगा म्हणतात. त्याला दोन पंख असून तो डासासारखा दिसतो. याच किडक्याने जोर्जाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या