मुंबई, 18 जानेवारी : कॅन्सर अर्थात कर्करोग हा गंभीर स्वरुपाचा आणि जीवघेणा आजार मानला जातो. या आजाराचं निदान झाल्यास संबंधित रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय मानसिकदृष्ट्या खचून जातात. मात्र काही रुग्ण या आजाराचा मोठ्या धीरानं सामना करत उपचार घेतात. कॅन्सरवर दिल्या जाणाऱ्या थेरपी आणि औषधांचा संबंधित रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम देखील होतो. कॅन्सरवरील उपचार सुरू असताना केस गळणं, टक्कल पडणं असे दुष्परिणाम दिसून येतात. अर्थात, या गोष्टीला अन्य कोणताही पर्याय नसतो. मात्र कॅन्सरग्रस्त महिलांसाठी ही बाब मानसिकदृष्ट्या वेदनादायी असते. सध्या अशाच एका कॅन्सरग्रस्त महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही महिला सलूनमध्ये केस कापण्यासाठी आली आहे. सलूनमधील हेअर स्टायलिश या महिलेचे सर्व केस कापून टाकत आहे. यामुळे ही महिला अत्यंत भावनिक होते. महिलेची ही मानसिक वेदना आणि अश्रू पाहून हेअर स्टायलिश तिचं सात्वंन करत एक कृत्य करताना दिसत आहे. सलूनमधील हेअर स्टायलिशचे हे कृत्य पाहिल्यानंतर नेटकरी क्षणभर भावनिक होत आहेत. या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करणं ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. हा कालावधी प्रत्येक कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी कठीण असतो. या काळात अनेक रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातात. पण त्यांनी धीर कायम ठेवणं गरजेचं आहे. दुसरीकडे असे काही रुग्ण असतात, ज्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अशा कठीण काळातही कायम असतं. मात्र काही रुग्ण क्षणोक्षणी भावनिक होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल. या व्हिडिओत एक कॅन्सरग्रस्त महिला मुंडन करण्यासाठी सलूनमध्ये येते. यादरम्यान ती खूप भावूक होऊन रडू लागते. या दरम्यान, रुग्णाला रडताना पाहून हेअर स्टायलिश असं काही कृत्य करतो की ते पाहून तुमचे ही डोळे पाणावतील. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सही भावनिक होताना दिसतात. या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओत एक कॅन्सरग्रस्त महिला सलूनमध्ये येत केस कापताना दिसत आहे. यावेळी सलूनमधील हेअर स्टायलिश ट्रिमरने या महिलेचं मुंडन करत आहे. केस कापताना ही महिला ढसाढसा रडत आहे. ही महिला रडताना पाहून हेअर स्टायलिश तिच्या डोक्याचं चुंबन घेत तिचं सात्वंन करताना दिसत आहे. त्याचवेळी तो या महिलेच्या पाठीमागे उभा राहून ट्रिमरने स्वतःचं मुंडन करताना दिसत आहे. हे पाहून या महिलेला धक्का बसतो. मात्र हेअर स्टायलिश या महिलेच्या खांद्यावर हात ठेवत दुसऱ्या हाताने आपल्या डोक्यावर ट्रिमर फिरवताना दिसत आहे. यावेळी ही कॅन्सरग्रस्त महिला आणि हेअर स्टायलिश असे दोघंही खूप भावनिक झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील.