मुंबई 27 ऑगस्ट : सकाळी नाश्ता (breakfast) केल्यावर दुपारी जेवताना (lunch) काय खाणार, याचा आपल्यापैकी बर्याच जणांनी विचारही केलेला नसतो. खाण्यापिण्याचा मेन्यूही (food menu) मूडनुसार बदलतो; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की एका महिलेने पुढच्या तब्बल आठ महिन्यांसाठी केवळ स्वत:साठीच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी अन्न तयार (Woman Cooks Food For 8 Months) करून ठेवलं आहे. होय, हे खरे आहे. तीस वर्षांच्या केल्सी शॉ (Kelsey Shaw) या महिलेने तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी पुढच्या आठ महिन्यांचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण तयार करून ते स्टोअर केलं आहे. आता जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हा ते हेच अन्न गरम करून खातात. केल्सी शॉ हिच्या घरातली पँट्री (home pantry) घरी लागवड केलेल्या भाज्यांनीच भरली आहे. याशिवाय या पँट्रीत शिजवलेलं अन्न, औषधी वनस्पती, तांदूळ आणि पास्तादेखील स्टोअर करून ठेवण्यात आलाय. या सुपर ऑर्गनाइज्ड आईने (super organized mom) तिच्या पँट्रीमध्ये स्टोअर केलेलं हे अन्न तिच्यासोबत तिचं कुटुंब पुढचे आठ महिने खाणार आहे. तीन मुलांची आई असणाऱ्या केल्सीने असं का केलं, याचं कारणही खूप हटके आहे. ते कारण म्हणजे बचत करणं. आता हे कसं शक्य आहे, ते आपण जाणून घेऊ या. ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा Pregnant झाली महिला म्हणून अन्न स्टोअर करण्याचा घेतला निर्णय केल्सीचे जीवन अतिशय ऑर्गनाइज्ड अर्थात शिस्तबद्ध आहे. ती प्रत्येक पदार्थ स्टोअर करण्यास शिकलीय. लोणचं असो वा मांस, तिला हे अन्न स्टोअर करण्याचं प्रत्येक टेक्निक माहिती आहे. अन्न स्टोअर करण्यासाठी केल्सीला तीन महिने लागतात. तिचं कुटुंब उन्हाळ्यात घरातच पिकवलेल्या फळभाज्या ताज्या खातं; पण हिवाळ्यासाठी त्या स्टोअर करून ठेवल्या जातात. हेच स्टोअर केलेलं अन्न खातात. केल्सीने अन्न स्टोअर करण्यास सुरुवात केली, जेणेकरून तिचं कुटुंब वर्षभर फक्त घरगुती अन्नच खाऊ शकेल. पैशांची होते बचत सर्व भाज्या घरीच लावण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, कुटुंबाला ताजं अन्न मिळतं. दुसरं म्हणजे पैसेही वाचतात. केल्सीच्या म्हणण्यानुसार, ‘कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास ती पूर्णपणे तयार असेल. ती दररोज सुमारे दोन तास बागेत घालवते. शेतातल्या भाज्या कापून शिजवल्या जातात.’ आपल्या मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहावं, अशी तिची इच्छा होती. या कारणास्तव तिने संपूर्ण कुटुंबासह शेतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. केल्सी सांगते, ‘अन्नपदार्थ कसे स्टोअर करायचे, हे शिकणं कठीण होतं; पण आता मला माझ्या या टॅलेंटचा अभिमान आहे.’ एकीकडे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण नेमकं काय करावं, याचं अनेकांचं नियोजन नसतं. अशातच केल्सीने संपूर्ण कुटुंबासाठी आठ महिन्यांचं अन्न करून ठेवले असून, या प्रकाराची मोठी चर्चा सुरू आहे.