JOIN US
मराठी बातम्या / Viral / कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs

कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs

जीममध्ये घाम न गाळताच या व्यक्तीने 6 पॅक अॅब्ज बनवल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 06 मे : आपले 6 पॅक अॅब्ज असावेत असं बहुतेक पुरुषांना वाटतं. त्यासाठी ते बरीच मेहनत घेतात. आपल्या आहाराची काळजी घेतात. जीममध्ये जाऊन एक्सरसाइझ करून घाम गाळतात. किती तरी दिवस मेहनत केल्यानंतर कुठे त्यांना हवे तसे 6 पॅक अॅब्ज मिळतात. पण एका व्यक्तीने डाएट-एक्सरसाइझ न करता फक्त दोन दिवसांतच 6 पॅक अॅब्ज बनवले आहेत (Man made perfect 6 pack abs in just 2 day). या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या युनिक ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओ शेअर केला. बऱ्याच कालावधीपासून तो जीममध्ये आपली बॉडी बनवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काही शक्य झालं नाही. अखेर त्याने जीममध्ये जाणं बंद केलं आणि त्याऐवजी तो टॅटू आर्टिस्टकडे गेला. त्याने त्याच्या पोटावर असा टॅटू बनवला जो खऱ्या 6 पॅक अॅब्जसारखा दिसू लागला. या टॅटू आर्टिस्टचं नाव गुंथर असं आहे. गुंथर मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. पण तो आता ग्रेटर मेनचेस्टरमध्ये काम करतो.  द सनशी बोलताना गुंथरने सांगितलं की, एक व्यक्ती त्याच्याकडे एक फोटो घेऊन आला. त्याने सांगितलं की जिममध्ये कित्येक तास घाम गाळूनही तो अॅब्ज बनवू शकला नाही. त्यामुळे त्याला आपल्या पोटावर अॅब्ज टॅटू बनवायचा आहे. हे वाचा -  कसं शक्य आहे! बटर, चीझवर मारला ताव; बिलकुल केली नाही एक्सरसाईझ; तरी महिलेने घटवलं 50 किलो वजन त्याने याआधीही काही लोकांच्या पोटावर असे अॅब्ज टॅटू बनवले आहेत. पण त्यात काही ना काही उणीव होती. आपली फिनिशिंग सुधारण्यासाठी त्याने खूप प्रॅक्टीस केली आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. हा टॅटू पूर्ण करण्यासाठी दोन दिस लागले. शेवटी टॅटू असा दिसेल याची आशाही नव्हती. पण रिझल्ट पाहून क्लाइंटही खूश झाला, असं गुंथऱ म्हणाला. जर कुणाला फक्त दोन दिवसांतच अशी बॉडी हवी असेल तर त्या टॅटू आर्टिस्टशी संपर्क करावं, असं या व्यक्तीने आपले फोटो शेअर करत सांगितलं. गुंथरचं हे टॅलेंट पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं आहे. पण या व्यक्तीला टॅटूऐवजी एक्सरसाइझनेच अॅब्ज बनवायला हवे होते, असा सल्ला बहुतेकांनी दिला आहे. हे वाचा -  Swiggy वरून ऑर्डर केली Coffee पण…; Delivery Boy चा प्रताप पाहून ग्राहक शॉक या आर्टिस्टचं टॅलेंट तुम्हाला कसं वाटलं आणि ज्या पद्धतीने या व्यक्तीने सहजरित्या 6 पॅक अॅब्ज मिळवले ती पद्धत योग्य आहे का? याबाबत आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या