नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल का असतो? यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याची सुरुवात एका IRTS अधिकाऱ्याच्या ट्वीटपासून सुरू झाली. IRTS अधिकाऱ्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, जर एका खोलीत 10 एकसारख्या खुर्च्या असतील तर सीनिअरची खुर्ची कशी ओळखाल? त्यावर पांढरा टॉवेल ठेवा. या ट्वीटनंतर युजर्स कमेंट्स करीत प्रतिक्रिया देत आहेत काही अधिकाऱ्यांनी ही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं झालं असं की, IRTS अधिकारी संजय कुमार यांनी प्रशासकाबाबत ट्वीट करीत खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवल्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी लिहिलं की, एकदा माझ्या वरिष्ठांनी मला विचारलं की, टॉवेल नाहीये? मी म्हणालो, सर खुर्ची स्वच्छ आहे.
कशी झाली खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवण्याची सुरुवात? IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवण्याची सुरुवात कशी झाली. याबाबत IRS अधिकारी विकास प्रकाश सिंह यांनीही आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी लिहिलं की, याची सुरुवात शक्यतो, ब्रिटीश काळात जाड कुशन असलेल्या खुर्ची असताना झाली असावी. त्यावेळी एसी वगैरे नव्हता. घामामुळे खुर्ची ओली होत होती. त्यामुळे त्यावर टॉवेल ठेवला जात होता. मात्र कालांतराने हा स्टेटस सिंम्बल झाला. जो आजही सुरू आहे.
हे ही वाचा- क्या बात है! IAS अधिकाऱ्यांना मिळते मिळते VVIP ट्रीटमेंट; सुविधांबद्दल वाचाच काय म्हणाले लोक? IRTS अधिकारी संजय कुमार यांच्या ट्वीटवर IAS सोमेश उपाध्याय यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं..सेंटरमध्ये असणारी खुर्चीदेखील..म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात मध्ये असलेल्या खुर्चीवर बसणं स्टेटस सिंम्बल झालं आहे.