JOIN US
मराठी बातम्या / Viral / WhatsApp बंद, नेटकरी सोशल मीडियावर सुसाट, ट्वीटरवर मीम्सची आतषबाजी

WhatsApp बंद, नेटकरी सोशल मीडियावर सुसाट, ट्वीटरवर मीम्सची आतषबाजी

व्हॉट्सअॅपची सेवा बदं असल्याचे दिसून आले. भारतातच नाही तर जगभरात ही सेवा बंद पडल्याने व्हॉट्सअॅप युजर्सना मोठा फटका बसला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑक्टोबर : अब्जावदी लोकांचे संवाद सांधण्याचे माध्यम व्हॉट्स अपची सेवा अचानक बंद पडल्याने अनेकांची तारांबळ उडाली. आज (दि. 25) दुपारी 12 ते 2.30 या दरम्यान व्हॉट्सअपची सेवा बदं असल्याचे दिसून आले. भारतातच नाही तर जगभरात ही सेवा बंद पडल्याने व्हॉट्सअप युजर्सना मोठा फटका बसला. या प्रकारामुळे मात्र सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला होता.  

दरम्यान, मागच्या काही काळातही अशीच सेवा बंद पडल्याने युजर्सना फटका बसला होता. या सगळ्याचा आनंदही काही नेटकऱ्यांनी घेतला.  नेटकऱ्यांनी मात्र मीम्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या मीम्समुळे ट्वीटर आणि टेलेग्रामवर युजर्स चांगलीच मजा घेताना दिसून आले. व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मार्क झुकेरबर्ग यांच्यावरही मीम्स बनवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

हे ही वाचा :  हे मेसेज पाठवाल तर थेट तुरुंगात जाल! WhatsAppचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

दरम्यान, सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकले नसले तरी त्यावर काम सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, व्हॉट्सॲप डाऊनहोताच ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला असून मिम्सचा पाऊस पडत आहे. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत.

जाहिरात
जाहिरात

हा प्रकार साधारणपणे गेल्या दीड ते दोन तासापासून जाणवत आहे. व्हॉट्सॲप नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीय. त्याचबरोबर व्हॉट्सॲप स्टेटसही अपलोड होण्यास अडचणी येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या