JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरेरे! असं काय झालं की, लग्नात आलेल्या पाहुण्यांना धुवावी लागली ताटं; Video पाहून हैराण व्हाल!

अरेरे! असं काय झालं की, लग्नात आलेल्या पाहुण्यांना धुवावी लागली ताटं; Video पाहून हैराण व्हाल!

Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : लग्नाच्या (Marriage) सीजनमध्ये नवरदेव-नवरीशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्न हा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणापैकी एक असतो. नवरा-नवरी लग्नाचा सोहळा विस्मरणीय होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असताता. आजकाल तर नवरीच्या एन्ट्रीसाठीही मोठी तयारी केली जाते. एकंदर लग्न कायम आठवणीत राहावं यासाठी लोक हवे तितके पैसे खर्च करण्याच्या तयारीत असतात. लग्नात आलेले पाहुणे अचानक धुवू लागले ताटं… सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नात आलेले पाहुणे आपली ताटं धुताना दिसत आहेत. हा व्हिडीओ (Video Viral On Social Media) नेमका कुठला आहे, याची माहिती हाती लागलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेक जणं हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये लग्नाचा माहोल दिसत आहे. वेडिंग वेन्यूवर सर्वत्र सजावट केली आहे. एका कोपऱ्यात टेंट लावला आहे आणि समोर फाऊंटन तयार करण्यात आला आहे. फाऊंटनमध्ये पाण्याचे कारंजे दिसत आहेत. लग्नादरम्यान नवरा-नवरी स्टेजवरुन नव्या आयुष्याची सुरुवात करीत होते. तर दुसरीकडे एक मजेशीर घटना घडली आहे. लग्नात आलेले पाहुणे कारंज्यासमोर उभं राहून ताटं का बरं धुवत आहे? हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडीओमध्येच मिळेल.

तर मिळालेल्या माहितीनुसार, जेवणाच्या प्लेट्स कमी पडल्यामुळे काही लोक खरकटी ताटं कारंज्यात धुण्यासाठी पोहोचले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यूट्यूब मीडिया मराठी चॅनलने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या