(फोटो- डेलीस्टार- Bethany Coker/TikTok)
नायक किवा नायिका जीव वाचवण्यासाठी एखाद्या गाडीच्या डिक्कीत (Car Trunk) बसून प्रवास करत असल्याचा नाट्यमय प्रसंग आपण चित्रपटात पाहतो; पण प्रत्यक्षातही असा एक थरारक अनुभव अमेरिकेतील एका महिलेला आला आहे. तिच्या गाडीच्या डिक्कीत नग्नावस्थेतील एक वेडसर पुरुष (Naked Man) दोन दिवस लपून बसल्याचं उघडकीस आलं आहे. या महिलेचं नाव बेथनी कोकर (Bethany Coker) असं असून, तिनं टिकटॉकवर (Tiktok Video Viral) एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्यावर ओढवलेला हा भीतीदायक प्रसंग वर्णन करून सांगितला आहे. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, अलीकडेच एके दिवशी रात्री उशिरा घरी परत आल्यावर तिनं गाडी नेहमीप्रमाणे घराच्या फाटकाजवळ लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती गाडी काढायला आली तेव्हा तिला गाडी खूप घाण झालेली दिसली. गाडीवर सगळीकडे खूप माती, चिखल लागलेला होता. गाडीच्या आत सीटवरदेखील चिखल (Mud) होता. हे सगळं बघून तिला मोठा धक्का बसला. गाडी कोणीतरी रात्री वापरली असावी असं तिच्या लक्षात आलं. त्याचवेळी तिची नजर गाडीच्या डिक्कीवर पडली आणि तिला आणखी एक धक्का बसला. तिला संशय आला आणि तिनं डिक्की उघडली. आतलं दृश्य बघून तर ती अक्षरश: हबकली. डिक्कीत एक नग्नावस्थेतील पुरुष झोपला होता. या माणसानंच गाडी घाण केल्याचं बेथनीच्या लक्षात आलं, तिनं ताबडतोब पोलिसांना कळवलं. पोलीस तातडीनं बेथनीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्या माणसाला डिक्कीतून बाहेर काढलं आणि आपल्या ताब्यात घेतलं. हे वाचा- ‘कंदिला’मध्ये बसून करावं लागतं जेवण, वाचा काय आहे नेमका या हॉटेलमधील प्रकार? पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे विचारणा केली की तो कोण आहे? गाडीच्या डिक्कीत का लपला होता? तेव्हा त्या माणसानं उत्तर दिलं की, तो पोपचा मुलगा आहे आणि कारमध्ये बसल्यानंतरच तो थेट ईश्वराशी संवाद साधू शकतो, म्हणून तो बेथनीच्या गाडीच्या डिक्कीत बसला होता. त्याची ही कहाणी अर्थातच पटण्यासारखी नव्हती. पोलिसांनी या माणसाबाबत आणखी चौकशी केल्यानंतर तो वेड्यांच्या रुग्णालयातून पळून गेलेला एक रुग्ण असल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता आणि तेव्हापासून तो बेथनी कोकरच्या गाडीच्या डिक्कीत लपून बसला होता. हे वाचा- नवरोबांचं खरं नाही! ‘विकलेला माल परत घेणार नाही’; महिलेने पतीला काढलं विकायला.. बेथनी कोकरनं आपल्याला आलेला हा थरारक अनुभव या व्हिडीओत अगदी सविस्तरपणे सांगितला आहे. रात्री उशिरा परत आल्यावर तिनं डिक्की उघडली असती, तर ती मनोरुग्ण व्यक्तीनं तिच्यावर हल्ला चढवण्याचीही शक्यता होती. अतिशय भीतीदायक असा अनुभव असल्याचं तिनं म्हटलं असून, लोकांनीही काळजी घ्यावी असंही तिनं म्हटलं आहे. बेथनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, 16 हजार लोकांनी तो पाहिला आहे.