JOIN US
मराठी बातम्या / Viral / हात सॅनिटाइझ करून पेटवली मेणबत्ती अन् झाला स्फोट, नेमकं काय घडलं वाचा

हात सॅनिटाइझ करून पेटवली मेणबत्ती अन् झाला स्फोट, नेमकं काय घडलं वाचा

या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हाताला सॅनिटायझर लावला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर सर्वात महत्त्वाचा घटक समजला जातो. कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी या सॅनिटायझरचा उपयोग होत असताना अनेक वेळा हा सॅनिटायझर आगीपासून आणि उष्ण गोष्टींपासून दूर ठेवण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. मास्क आणि सॅनिटायझर कोरोना काळातील लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. मेणबत्ती लावताना सॅनिटायझरनं पेट घेतला आणि अनर्थ घडला. ही घटना टेक्सासमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जखमी असलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेवर सध्या ICUमध्ये उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

हे वाचा- स्विमिंग करणाऱ्या तरुणाचा शार्कने पकडला हात, पुढे काय झालं पाहा VIDEOस्विमिंग कर या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हाताला सॅनिटायझर लावला होता. त्यानंतर त्या मेणबत्ती लावत असताना अचानक स्फोट झाला आणि पेट घेतला. मेणबत्ती लावलेली असताना अचानक आगीनं रौद्र रुप धारण केलं. सॅनिटायझर या आगीत आल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि आग पसरली. आगीच्या संपर्कात सॅनिटायझरची बाटली आल्यानं हा प्रकार घडल्याचं ही महिला सांगते. 5 मिनिटांत मी आगीच्या भक्ष्यस्थानी होते. घरात मुली पटकन मदतीला धावून आल्या आणि सुदैवानं माझा जीव थोडक्यासाठी वाचला. सॅनिटायझर ज्वलनशील पदार्थ असल्यानं आगीपासून किंवा उष्ण वस्तूंपासून कायम दूर ठेवण्याचं आवाहन केलं जातं. मात्र एक छोटी चूक जीवावर बेतू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या