JOIN US
मराठी बातम्या / Viral / शाळेत जाण्याची इच्छा नसलेल्या मुलाला बघून तुम्हालाही वाटेल काळजी; चालत्या गाडीवरील Video Viral

शाळेत जाण्याची इच्छा नसलेल्या मुलाला बघून तुम्हालाही वाटेल काळजी; चालत्या गाडीवरील Video Viral

शाळेत न जाण्यासाठी हट्ट धरलेल्या मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील Viral

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जानेवारी : बहुतांश लहान मुलांना शाळेत जाण्याचा कंटाळा असतो. शाळेत न जाता घरीच मजा-मस्ती करण्याची इच्छा असते. मात्र, चांगल्या भविष्यासाठी शिक्षणाची गरज असते म्हणून आई-वडील मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आग्रही असतात. आजकाल तर अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि पुन्हा घरी आणण्यासाठी जातात. अनेकदा मुलं शाळेत न जाण्याचा हट्ट धरतात. त्यांनी कितीही हट्ट केला तरी त्यांचे पालक त्यांना शाळेत घेऊनच जातात. शाळेत न जाण्यासाठी हट्ट धरलेल्या मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पहायला मिळतात. या व्हिडिओंमधील लहान मुलांचा निरागसपणा आणि खोडकरपणा बघून अनेकांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला स्कूटीवर बसून शाळेत घेऊन जाताना दिसत आहे. पण, गाडीवर चिडलेल्या मुलानं असं कृत्य केलं की, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… शाळेत जाण्यापासून सुटका मिळावी यासाठी मुलं विविध युक्त्या करताना दिसतात. या युक्त्या बघून पालकही आश्चर्यचकित होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुलगाही शाळेत जाण्यासाठी इच्छुक नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dasadlatif1212 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून युजर्सही थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला स्कूटीवर घेऊन जाताना दिसत आहे. या मुलानं शाळेचा ड्रेस घातलेला आहे आणि त्याच्या खांद्यावर शाळेची बॅगही लटकवलेली आहे. गाडीवर बसलेला मुलगा खूपच उदास दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की, त्याला शाळेत जाण्याची इच्छा नाही पण, त्याची आई त्याला जबरदस्ती शाळेत घेऊन जात आहे. स्कूटीच्या मागच्या सीटवर हा रुसलेला मुलगा मांडी घालून बसलेला दिसत आहे. जे पाहून युजर्सही घाबरले आहेत. कारण, स्कूटीवरील मुलाचा थोडासा जरी तोल बिघडला तर तो खालू पडू शकतो. या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, दोन लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आजकाल अनेक पालक, विशेषत: मुलांच्या आया त्यांना शाळेत सोडवायला जाताना स्कूटीसारख्या मोपेड गाड्यांचा वापर करतात. बहुतेक मुलं समोर लेगस्पेसमध्ये उभी राहतात किंवा मागे बसतात. अशावेळी गाडी चावलताना पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या