JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : ख्रिसमस डेकोरेशनचा असा फसला प्लान, क्रॉस घेऊन आला तरुण आणि...

Viral Video : ख्रिसमस डेकोरेशनचा असा फसला प्लान, क्रॉस घेऊन आला तरुण आणि...

एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ ख्रिसमस डेकोरेशनच्या तयारीचा आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 डिसेंबर : ख्रिसमस अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे लोकांची लगबग सुरु आहे ती याच्या सेलिब्रेशनची. ख्रिस्ती धर्मीय ख्रिसमसच्या तयारीला लागले आहेत. खाण्याच्या पदार्थापासून ते अगदी कपडे आणि घर सजनवण्यापर्यंत सगळ्याच कामाला सुरुवात होते. यासंबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. पण एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ ख्रिसमस डेकोरेशनचा आहे. याची तयारी करताना एका व्यक्तीसोबत असा प्रकार घडतो की बस्स… हे ही पाहा : लसीकरण करताना बाळाला असं फसवलं… व्हिडीओ पाहून थांबनार नाही हसू या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती क्रॉस घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. क्रॉस सहसा लहान असतो, जो सहजपणे हातात नेता येऊ शकतो. मात्र, हा माणूस खूप मोठा क्रॉस घेऊन जात आहे. हे एक चर्च क्रॉस असल्याचे दिसत आहे. नाताळचा उत्साह त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. तो आनंदी आहे आणि त्याचे काम चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेव्हाच त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला. तो क्रॉस घेऊन स्वयंचलित जिन्यांवरुन वर येत होताय तेव्हा त्याचा क्रॉस छताच्या वरच्या बाजूला जाऊन अडकला. त्यानंतर खूप प्रयत्न करुन या व्यक्तीने क्रॉस बाहेर काढला आणि नुकसान होण्यापासून वाचवले.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे. हा व्हिडीओ सध्या ख्रिसमस डेकोरेशन फेल म्हणून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या